Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

How To Get Rid Of Belly Fat : पोटाच्या हट्टी चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी  कार्बोहायड्रेटचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:40 PM2024-02-01T12:40:29+5:302024-02-01T13:23:50+5:30

How To Get Rid Of Belly Fat : पोटाच्या हट्टी चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी  कार्बोहायड्रेटचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा.

How To Get Rid Of Belly Fat : Simple Ways To Lose Belly Fat Based On Science | पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

काहीजण रोज व्यायाम-डाएट करतात तरी त्यांचे पोट कमी होत नाही. (How To Get Rid Of Belly Fat) डाएट केले तरी त्याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. पोटाच्या हट्टी चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Natural Home Remedies To Reduce Belly Fat) आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. (How To Lower Belly Fat The Heathy Way) अंजली जवळपास २० वर्षांपासून या फिल्डमध्ये काम करत आहेत. त्या डाएट एक्सपर्टसुद्धा आहे. (Simple Effective Ways To Reduce Belly Fat)

पोटाच्या चरबीमुळे फक्त सुंदरता कमी होत नाही तर हाय ब्लड प्रेशर, हार्ट डीसिज, डायबिटीस, फॅटी लिव्हर, कॅन्सर यांसारख्या आजारांचाही बचाव होतो. (Simple Ways To Lose Belly Fat Based On Science) खाण्यात अन्हेल्दी पदार्थ, व्यायामाचा अभाव, व्यवस्थित झोप न घेणं, वाढतं वय ताणतणाव यामुळे पोटाची चरबी वाढू लागते.

1) गरम पाणी

२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म  ३० टक्क्यांनी वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. (Ref) एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्याच्या पद्धतीचा एक भाग म्हणून भरपूर पाणी पिण्याची शिफारस केली जाते. शरीराचे वजन, बॉडी मास्त इंडेक्स या आधारावर जास्तीत जास्त आणि त्याचे मुल्यांकन करण्यात आले.

2) कार्बोहायड्रेट्सचे कमी प्रमाणात सेवन करा

पोटाच्या हट्टी चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी  कार्बोहायड्रेटचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा. तुम्हाला रेग्युलर डाएटमधून कार्बोहायड्रेट्स कमी करण्याची काही गरज नाही. कारण यातून तुम्हाला पुरेपूर एनर्जी मिळते. वेट लॉस  डाएटसाठी फळं आणि भाज्यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा. रिफाईन्ड आणि प्रोसेस फूडचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा.

पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी

3) फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

वजन कमी करण्यासाठी सोल्युबल फायबर्स गरजेचे असतात. सोल्यूबल फायबर्स पाण्यामुळे आतड्यात एका जेलप्रमाणे तयार होतात. या जेलमुळे अन्न पचायला वेळ लागतो. आतड्यांमध्ये पोषक तत्वांची कमतरता भासते आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. भूकही जास्त लागत नाही. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. फायबर्समुळे  वजन कमी करण्यास मदत होते. पालेभाज्या, शेंगा यांचा आहारात समावेश करा.

4) प्रोटीन्सचे सेवन वाढवा

जर वजन कमी करण्याचे प्रयत्न केल्यानंतरही वजन कमी होत  नसेल आहारात जास्तीत जास्त प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रोटीन्सच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि खाण्याची इच्छा कमी होते तसंच दीर्घकाळ भूकही लागत नाही. प्रोटीनमुळे फक्त पोटाची चरबी कमी होत नाही तर वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

5) जास्त खाऊ नका

हेल्दी फूड्स खाताना आपण जास्त कॅलरीजचे सेवन करतो. अशाववेळी कॅलरीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी  दिवसातून ३ वेळा जास्त खाण्याऐवजी दिवसातून ४ ते ५ वेळा थोडं थोडं खा.

पाय दुखेपर्यंत चालता तरी पोट कमी होत नाही? चालण्याची योग्य वेळ-पद्धत पाहा, लवकर फिट व्हाल

6) व्यायाम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी डाएट फॉलो करण्याबरोबरच रोज व्यायाम करणं गरजेचं असतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज १ तास ब्रिस्क वॉक करा. याव्यतिरिक्त पोटाच्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी वेट ट्रेनिंग, पिलाटे्स, योग आणि कार्डिओवॅस्कुलर व्यायाम करायला हवेत. पोट कमी होण्याव्यतिरिक्त मेटाबॉलिझ्म वाढण्यासही मदत होत आणि ब्लोटींग कमी होते. 

Web Title: How To Get Rid Of Belly Fat : Simple Ways To Lose Belly Fat Based On Science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.