Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हॉटेलचं जेवण किंवा तेलकट- तुपकट खाल्लं की पोट जड होतं? करा १ सोपा उपाय, अपचनाचा त्रास मुळीच होणार नाही

हॉटेलचं जेवण किंवा तेलकट- तुपकट खाल्लं की पोट जड होतं? करा १ सोपा उपाय, अपचनाचा त्रास मुळीच होणार नाही

Home Remedies For Bloating And Indigestion: काही जणांना बाहेरचं हेवी जेवण झालं की लगेच अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांनी हा एक सोपा उपाय बघून घ्यायलाच पाहिजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 12:43 PM2023-10-10T12:43:13+5:302023-10-10T12:55:19+5:30

Home Remedies For Bloating And Indigestion: काही जणांना बाहेरचं हेवी जेवण झालं की लगेच अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांनी हा एक सोपा उपाय बघून घ्यायलाच पाहिजे...

How to get rid of bloating problem after eating outside? Home remedies for indigestion, gases and acidity | हॉटेलचं जेवण किंवा तेलकट- तुपकट खाल्लं की पोट जड होतं? करा १ सोपा उपाय, अपचनाचा त्रास मुळीच होणार नाही

हॉटेलचं जेवण किंवा तेलकट- तुपकट खाल्लं की पोट जड होतं? करा १ सोपा उपाय, अपचनाचा त्रास मुळीच होणार नाही

Highlightsहा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील फक्त ३ वस्तू लागणार आहेत. 

कधी कधी घरचं खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मग आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा प्लॅन करतो. किंवा कधी कधी एखाद्या कार्यक्रमानिमित्त किंवा इतर काही कारणांमुळे घराबाहेर जेवण होतं. बाहेरचं जेवण म्हणजे बऱ्याचदा तेल, तूप, मसाले, मैदा यांचा भरपूर वापर असलेलं असतं. असं जेवण झालं की मग अनेक जणांना पोट जड झाल्यासारखं वाटतं (How to get rid of bloating problem after eating outside?). काही जणांना गॅसेसचा त्रास होतो तर काही जणांना ॲसिडिटी, पित्त झाल्यासारखं जाणवतं. बाहेरच्या जेवणामुळे अशा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा. (Home remedies for indigestion, gases and acidity)

 

बाहेरच्या जेवणाने पोट जड झालं असेल तर....

बाहेरचं खाल्ल्याने पोट जड झालं असेल तर काय करावं, याविषयीचा हा एक सोपा घरगुती उपाय इन्स्टाग्रामच्या dietitian_manpreet या पेजवर एका आहारतज्ज्ञांनी सुचविला आहे.

ट्विंकल खन्नाने केली एक जादू आणि जुनी जीन्स झाली एकदम स्टायलिश- हटके, बघा नेमकं काय केलं तिने....

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातील फक्त ३ वस्तू लागणार आहेत. 

त्यासाठी एका भांड्यात २ टेबलस्पून सुंठ पावडर, २ टी स्पून ओवा आणि २ टेबलस्पून गूळ घ्या.

 

हे तिन्ही पदार्थ एकत्र कालवून छान एकजीव करून घ्या आणि त्याच्या छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या तयार करा. गोळ्यांचा आकार साधारणपणे एखाद्या वटाण्याएवढा असावा. फ्रिजमध्ये एअर टाईट डब्यात या गोळ्या ठेवल्यास ३ दिवस चांगल्या राहतील.

स्वत:ला होणारा एन्झायटीचा त्रास कसा ओळखायचा? बघा समीरा रेड्डी सांगतेय एन्झायटीची ५ लक्षणं आणि त्यावरचे ५ उपाय

जेव्हा तुम्हाला माहिती असेल की आता तुमचं जेवण बाहेर होणार आहे, तेव्हा जेवणाआधी ही एक गोळी घेऊन टाका. अपचनाचा त्रास होणार नाही.

Web Title: How to get rid of bloating problem after eating outside? Home remedies for indigestion, gases and acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.