Join us

पुरणपोळीचं जेवण जड होऊन अपचन होतं?  ३ उपाय- पुरणपोळीचा अजिबात त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 14:57 IST

How To Get Rid Of Indigestion After Eating Puranpoli: पुरणपोळी तर आपण मोठ्या उत्साहात खातो, पण नंतर मात्र अनेकजणांना अपचनाचा त्रास होतो. पुरणाचं जेवण खूप जड होतं.(3 tips for easy digestion of puranpoli)

ठळक मुद्देपुरणपोळी खाल्ल्यानंतर काही जणांना ॲसिडीटीचा त्रास होतो, काही जणांना उष्णता होऊन जुलाबही होतात.

आपल्याकडे काही सण असे असतात ज्याला पुरणाचं जेवण आपण आवर्जून करतोच. कारण पुरणपोळी खाल्ल्याशिवाय तो सण साजरा झाल्यासारखं वाटतच नाही. आता होळीच्या सणाचंही तसंच. होळी रे होळी, पुरणाची पोळी असं म्हणण्याची प्रथासुद्धा आहे. त्यामुळे होळीचा सण काही पुरणपोळीशिवाय साजरा होत नाही. आपण उत्साहाच्या भरात आणि आवडते म्हणून अगदी भरपेट पुरणपोळी खातो. पण त्यानंतर मात्र पोट जड झाल्यासारखं होतं. अपचन, ॲसिडीटी असे त्रास होऊ लागतात (How To Get Rid Of Indigestion After Eating Puranpoli?). म्हणूनच पुरणाचं जेवण करताना किंवा पुरणपोळी खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.(3 tips for easy digestion of puranpoli)

 

पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट जड होऊन अन्नपचनाचा त्रास होऊ नये म्हणून..

आपली तब्येत जपण्यासाठी पुरणपोळी खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ drmanasimehendale या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेल्या ३ गोष्टी पुरणपोळी खाताना नेहमी लक्षात ठेवाव्या..

दात पिवळे झाले- दाढा दुखतात? घ्या उपाय- दातांची सगळी दुखणी जाऊन मोत्यांसारखे चमकतील

१. पहिली गोष्ट म्हणजे हरबऱ्याची जाड थोडी वातुळ असते. त्यामुळे ती पचायला जड असते. म्हणूनच पुरणपोळी व्यवस्थित पचावी यासाठी तिच्यासोबत तूप थोडं जास्त खा. योग्य प्रमाणात तूप घालून पुरणपोळी खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही.

 

२. पित्त प्रकृती असलेल्या लोकांचं पुरणपोळी खाल्ल्यानंतर डोकं दुखतं. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी त्यांनी पुरणपोळीसोबत नारळाचं दूध आणि तूप खावे. कारण नारळाच्या दुधामध्ये असणारी स्निग्धता पुरणपोळी खाल्ल्यानंतर शरीरात होणारा पित्तप्रकोप कमी करण्यासाठी मदत करते.

विसराळूपणा वाढला- अनेक गोष्टी विसरून जाता? डॉक्टर सांगतात ६ पदार्थ खा- बुद्धी होईल तेज

२. दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी करत असताना त्यात जायफळ अवश्य घालावे. कारण पुरणपोळी खाल्ल्यानंतर काही जणांना ॲसिडीटीचा त्रास होतो, काही जणांना उष्णता होऊन जुलाबही होतात तर काही पित्त प्रकृतीच्या लोकांचा कफसुद्धा वाढतो. म्हणूनच अशा प्रकारचे त्रास टाळण्यासाठी पुरण शिजवताना त्यात जायफळ घालावे.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्स