निरोगी राहण्यासाठी काही फळं आणि भाज्या तुमची मदत करू शकतात. (Health Tips) फळं, भाज्या, व्हिटामीन्स, फायबर्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. (Lauki Juice Recipe) वजन कमी करण्यासाठी तुम्ही सिजनल भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करू शकता. असं पाहिलं जातं की ज्या मुली वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ज्यांना भरपूर पैसे खर्च करूनही हवातसा रिजल्ट मिळत नाही. (How to Make Bottle Gourd Juice At Home) घरच्याघरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वापर करता येईल. (Weight Loss Tips) दूधीचे नाव ऐकूनच काहीजण नाक मुरडतात.
रिसर्च जर्नल ऑफ फार्माकोलोजी एंडी फार्मोकोडायनॅमिक्सच्या रिपोर्टनुसार दुधीचा रस पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. यात ९६ टक्के पाणी असते. व्हिटामीन बी आणि सी सुद्धा असते. कमी कॅलरीजयुक्त असल्यामुळे या ज्यूसच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. वजन कमी करण्याबरोबरच अनेक आरोग्यदायी फायदे होतात. लिव्हरच्या चांगल्या कार्यासाठीही फायदेशीर ठरते. सकाळी ग्लासभर दुधीचा ज्यूस प्यायल्याने केस पांढरे होणं टाळता येतं. अल्सर,अस्थमाचे गंभीर विकारही टाळता येतात. डायटिशियन सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
वजन कमी करण्यासाठी दुधीचा ज्यूस जास्त फायदेशीर ठरतो
जर तुम्ही १ महिना रेग्युलर दूधीचा ज्यूस प्यायलात तर महिन्याभरात चांगला परिणाम दिसून येईल. दूधीच्या ज्यूसच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होईल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल. दुधीच्या भाजीत डायटरी फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमचं इतर काहीही खाण्याचं मन होत नाही आणि तुम्ही ओव्हरइटींगपासून वाचता. यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहिली तर आपोआपच वजन कमी होते. १०० ग्राम दुधीत जवळपास १५ कॅलरीज आणि १ ग्रााम फॅट असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी दुधीचा ज्यूस कसा बनवायचा? (How to Make Bottle Gourd Juice)
सगळ्यात आधी दुधी घ्या आणि सालं काढून किसून घ्या. १ आलं आणि १ टेबलस्पून काळं मीठ घ्या हे पदार्थ व्यवस्थित ग्राईंड करून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी किंवा मिड मॉर्निंगला हे ड्रिंक घ्या. दिवसाला १ ग्लासपेक्षा जास्त दुधीचा रस पिऊ नका. हा ज्यूस प्यायल्याने शरीराला पुरेपूर फायदा मिळेल. वजन कमी करण्यासाठी ज्यूससचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत.