Weight Loss Tips : वजन कमी करायचं असेल किंवा शरीरात वाढलेली चरबी कमी करायची असल्यास हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे टाळा ते टाळा...असे एक ना अनेक सल्ले एक्सपर्टकडून आपण नेहमीच ऐकत असतो. यातील काही गोष्टींमध्ये तथ्यही असतं. बरेच लोक तासंतास जिममध्ये वर्कआउट करतात. तर काही लोक घरी हलके-फुलके व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, शरीरात वाढलेल्या ज्या चरबीमुळे तुम्ही चिंतेत असता ती चरबी केवळ एक फळ रोज खाऊनही कमी करता येऊ शकते.
एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, हिरव्या सफरचंदमध्ये असे अनेक पोषक तत्व जसे की, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पेक्टिन असतात ज्यांच्या मदतीनं शरीर डिटॉक्स होतं. सोबतच पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि यामुळे तुमची ओव्हरईटिंगची शक्यताही कमी होते. अशात जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादा सोपा उपाय शोधत असाल तर हिरवा सफरचंद तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी परफेक्ट
एक्सपर्टनुसार, हिरव्या सफरचंदमध्ये डायटरी फायबर, कमी कॅलरी आणि भरपूर पाणी असतं. यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासोबत शरीराला भरपूर एनर्जी सुद्धा मिळते.
फायबरनं पोट भरलेलं राहतं
हिरव्या सफरचंदमध्ये आढळणाऱ्या डायटरी फायबरनं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे सतत भूक लागत नाही. तसेच तुमचं जास्तीचं खाणंही टाळलं जातं.
डिटॉक्सचा सोपा फंडा
हिरव्या सफरचंदमधील पेक्टिन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. ज्यामुळे लिव्हर आणि पचन तंत्र अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतं.
कधी खावं?
वर्कआउटआधी हिरवं सफरचंद खाल्ल्यानं शरीराला आवश्यक कार्ब्स आणि एनर्जी मिळते. तेच वर्कआउटनंतर यानं बॉडी लगेच रिफ्रेश होण्यास मदत मिळते.