Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

How To Identify original Cold Pressed Oil : घाण्याच्या तेलाचा वापर नेमका कसा करावा? आरोग्यासाठी त्याचा फायदा काय होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 01:01 PM2022-12-20T13:01:59+5:302022-12-20T13:56:28+5:30

How To Identify original Cold Pressed Oil : घाण्याच्या तेलाचा वापर नेमका कसा करावा? आरोग्यासाठी त्याचा फायदा काय होतो?

How To Identify original Cold Pressed Oil : Is eating Cold Press oil really beneficial for health? How to identify pure oil? | घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

घाण्याचे तेल खाणे खरेच आरोग्यासाठी फायदेशीर असते का? शुद्ध तेल कसे ओळखावे?

Highlightsघाण्याचं तेल आरोग्यासाठी जास्त चांगलं असं आपण अनेकदा ऐकतो, पण ते खरंच घाण्याचे असते का? आपण खरेदी करत असलेलं तेल खरंच घाण्यापासून काढलेलं असतं का, त्याची किंमत काय याविषयी..

भक्ती सोमण-गोखले

रोजच्या जेवणात आपल्याला तेल लागतंच. तेलाशिवाय आपलं जेवण पूर्णच  होऊ शकत नाही. मात्र ते तेल आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आजकाल लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही अंशी त्याचं मूळ हे तेलाशीही निगडीत आहे. त्यामुळे जे तेल आपण वापरणार असू ते पौष्टिक असणं हे आता फार महत्वाचं ठरू लागलेलं आहे. म्हणून आता लोकांचा ओढा घाण्याच्या तेलाकडे वळला आहे. शिवाय पारंपारिक पद्धतीने काढले जात असल्याने त्याचे महत्वही खूप आहे (How To Identify original Cold Pressed Oil).

माझे ९० वर्षांचे एक स्नेही आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी त्यांचे आरोग्य ठणठणीत कसं याविषयी सांगितलं. ते लहानपणापासून त्यांच्या शेतातून निघणारे शेंगदाणे, करडई लाकडी घाण्यात प्रोसेस करून ते कायम वापरायचे. त्यामुळे त्यांची तब्येत सुदृढ असण्याचं रहस्य कळलं. उलट हे लक्षात आलं की ९० वर्षांच्या आजोबांना आता या वयात तब्येतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र त्या समस्या आज माझ्या पिढीत ३० वर्ष आधीच दिसून येत आहे. जे आजार आहेत. त्यामुळे घाण्याचं तेल आरोग्याच्या दृष्टीने कसं महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं. याविषयी सविस्तर माहिती दिली ती लाकडी घाण्याची तेल निर्मिती करणारे पुण्यातील आरोग्यवेल तेलाचे प्रकाश आणि हर्षद फासे यांनी.



घाण्याचं तेल कसं ओळखायचं?

तेल तयार करण्याच्या  हॉट प्रेसिंग आणि कोल्ड प्रेसिंग अशा दोन पद्धती असतात. हॉट प्रेसिंगमध्ये तेल काढताना तापमान हे १०० ते ३०० डिग्रीपर्यंत असतं. तर घाण्यावर जे तेल काढलं जातं. त्यात तापमान ४५ ते ५० अंश असतं. कोणतीही गोष्ट खूप तापविल्यावर त्याचे पौष्टिकमूल्य कमी होते. त्यामुळे एकदा तळलेलं तेल आपण परत वापरत नाही. उच्च तापमानावर तयार झालेलं तेल आणि घाण्यावर काढलेल्या तेलाच्या गुणधर्मात फरक असतो. तसंच घाण्याचं तेल दिसायला गढूळ किंवा घट्ट असतं.कारण त्यात कुठलंही केमिकल, प्रिझर्वेटिव्ह नसंत. त्यात उष्णता निर्माण होत नाही. तर रिफाईंड तेल पातळ आणि चकचकीत दिसतं.त्यामुळे घाण्याच्या तेलाचा फायदा जास्त आहे. शेंगदाणा तेलाचं म्हणाल तर शेंगदाण्याचे गुणधर्म जसेच्या तसे घाण्याच्या तेलात उतरतात. महत्वाचं म्हणजे, तेलबियांमध्ये असलेली पोषक तत्वे, आरोग्यासाठी फायदेशीर असलेले घटक तसेच नैसर्गिक गंध व चव टिकून राहते. तसेच ही तेलं trans fats, bad cholesterol व इतर आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या घटकांपासून मुक्त राहतात. 

किमतीत का फरक असतो?

एक किलो शेंगदाणा तेल तयार करण्यासाठी अडीच किलो शेंगदाणे लागतात. १० किलो शेंगदाणे वापरले तर ४ किलो घाण्याचं तेल निघतं. महिन्याला अर्धा ते एक लिटर तेलाचा वापर माणशी केला जावा, असं डॉक्टर सुचवत असतात. माणूस दिवसातून ३ वेळा नाश्ता, जेवण,आणि रात्रीचे जेवण जेवतो. असे ते तीन वेळा खातो असं समजू. म्हणजे त्याचे महिन्याला ९० मिल्स(खाणं) होतात. त्यासाठी तुम्ही नेहमीच्या तेलापेक्षा घाण्याचे तेल विकत घेण्यासाठी १०० रूपये अतिरिक्त दिलेत.तर एक रूपया पर मिल तुम्ही घाण्याच्या तेलासाठी जास्त देता. 

(लेखिका मुक्त पत्रकार असून Three Cheers हे युट्यूब चॅनल चालवितात.)

bhaktigokhale2021@gmail.com

https://www.youtube.com/@threecheers5997

Web Title: How To Identify original Cold Pressed Oil : Is eating Cold Press oil really beneficial for health? How to identify pure oil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.