Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही

पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही

5 Foods For Good Gut Health: काही जणांचं पोट नेहमीच खराब असतं. अशा लोकांना आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.(how to improve gut health?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 18:28 IST2025-01-04T16:46:55+5:302025-01-04T18:28:41+5:30

5 Foods For Good Gut Health: काही जणांचं पोट नेहमीच खराब असतं. अशा लोकांना आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.(how to improve gut health?)

how to improve gut health, 5 food items that helps to get rid of indigestion | पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही

पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही

Highlightsज्यांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो त्यांनी रोजच्या दुपारच्या जेवणात पातळ ताक प्यायला हवं. जेवणाच्या शेवटी प्यायलं तर अधिक चांगलं.

काही जणांना पोटाचा खूपच त्रास असतो. जेवणात थोडं कमी- जास्त झालं की लगेच त्यांना पोट दुखण्याचा, गॅसेसचा त्रास होतो. काही जणांना करपट ढेकर येणे, मळमळ होणे, ॲसिडीटी होणे असाही त्रास होतो. तर काही जणांचं पोट गुबारून जातं म्हणजेच फुगल्यासारखं वाटतं. असं काही जर तुम्हाला वारंवार होत असेल तर हे काही पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणात असायला हवे, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. हे पदार्थ पचनक्रियेसाठी मदत करतात (how to improve gut health?). त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन अपचनाचा कोणताही त्रास होत नाही.(5 food items that helps to get rid of indigestion)

 

अपचनाचा त्रास होत असेल तर कोणते पदार्थ खावे?

अपचनाचा त्रास होत असेल तर कोणते पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी merisaheli या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले पदार्थ पुढीलप्रमाणे..

घरासाठी पडदे खरेदी करायचे? ४ टिप्स! नव्या वर्षात कमी खर्चात घराला मिळेल क्लासी लूक

१. ताक 

ज्यांना नेहमीच अपचनाचा त्रास होतो त्यांनी रोजच्या दुपारच्या जेवणात पातळ ताक प्यायला हवं. जेवणाच्या शेवटी प्यायलं तर अधिक चांगलं.

२. भाज्या

रोजच्या रात्रीच्या जेवणाच्या सुरुवातीला भाज्या अवश्य खायला पाहिजेत. मग तुम्ही त्या भाज्या उकडून खा, हलक्याशा तुपात परतून खा किंवा मग त्याचं सूप करून प्या. पण जेवणाची सुरुवात भाज्या असणाऱ्या पदार्थांनीच करा.

 

३. प्रोबायोटीक

इडली, डोसा, दही- भात, ढोकळा, वाटीभर दही हे पदार्थ प्रोबायोटीक मानले जातात. म्हणजेच हे पदार्थ पचनक्रियेसाठी मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून दोन- तीन वेळा हे पदार्थ आलटून पालटून खाल्ले पाहिजेत.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

४. मेथी आणि हळदीचा काढा

पोटाचा त्रास नेहमीच होत असेल तर दररोज सकाळी मेथ्या टाकून पाणी उकळा. ४ ते ५ मिनिटे उकळल्यानंतर पाणी गाळून घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर मिरेपूड टाका. व्यवस्थित हलवून घेऊन काढा प्या. यामुळेही पचनक्रिया चांगली होते.

पालकांनी वाढत्या वयातल्या मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी, मुलांवर होतील वाईट परिणाम

५. आवळा

सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे रोज एक आवळा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. रोज एक आवळा खाल्ल्यानेही पचनशक्ती उत्तम होण्यास आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. 


 

Web Title: how to improve gut health, 5 food items that helps to get rid of indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.