Join us  

आहारात फायबरचे प्रमाण कमी तर मानसिक आरोग्यही धोक्यात! फायबर असलेले कोणते पदार्थ खावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 8:10 AM

Benefits Of Eating Fiber Rich Food: सारखी चिडचिड होते, डिप्रेशन येतं, मनावर सतत कसला तरी ताण असतो... अशी परिस्थिती तुमचीही असेल तर आहारात फायबरचे प्रमाण कमी होत आहे हे लक्षात घ्या. 

ठळक मुद्देफायबर आहारात योग्य प्रमाणात असतील तर मानसिक आरोग्यासाठी नेमके कोणते लाभ होतात, याविषयी ही विशेष माहिती.

प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, फॅट्स या गोष्टी जशा आहारात असणं गरजेचं आहे, तसंच फायबर (fiber) देखील योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. फायबर योग्य प्रमाणात असतील, तर पचन आणि मेटाबॉलिझम (digestion and metabolism) म्हणजेच चयापचय क्रिया यांच्याशी निगडीत अनेक समस्या कमी होतात. पचन आणि चयापचय क्रिया व्यवस्थित असतील, तर आपोआपच आरोग्य उत्तम राहते. शारिरीक आरोग्यासोबतच (physical health) मानसिक आरोग्यासाठीही (mental health) आहारात फायबर योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. फायबर आहारात योग्य प्रमाणात असतील तर मानसिक आरोग्यासाठी नेमके कोणते लाभ होतात, याविषयी उमा नायडू यांनी सोशल मिडियावर शेअर केलेली ही विशेष माहिती. (how fibers affects on your mental health?)

 

फायबर भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ(Fiber rich food)धान्य कडधान्यफळंभाज्याडाळीसुकामेवाकाकडी केळीसफरचंदबीन्सबार्लीशेवग्याची पाने 

 

फायबर खाल्ल्यामुळे मानसिक आरोग्याला होणारे लाभ१. ताण कमी होतोThe Journal of Physiology मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार मनावरचा ताण कमी करण्यासाठी फायबर्स  असणारे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात. पचन क्रियेशी संबंधित बॅक्टेरिया आणि एन्झायटी, डिप्रेशन यांचा खूप जवळचा संबंध  आहे, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

 

२. मुड सुधारण्यास मदत होतेकधी कधी खूपच निराश वाटू लागतं. सगळं असूनही मनात काहीतरी अस्वस्थता असते. त्यामुळे मग खूप चिडचिड हाेते किंवा मग मुड स्विंगचा त्रास होतो. असा त्रास होऊ लागला की फायबर्स भरपूर असणारे काही अन्नपदार्थ खाऊन बघा. यातही काही प्राेसेस्ड फूड खाण्यापेक्षा फळं, सुकामेवा खा. काही अभ्यासानुसार असं सिद्ध झालं आहे की जे लोक फायबरयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खातात, त्यांना तुलनेने कमी स्ट्रेस येतो. तसेच ते खूप जास्त पॉझिटिव्ह असतात. 

 

३. नैराश्य कमी होतंछोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणे, त्यातून लगेचच निराश होणे, हा त्रास अनेक जणांना जाणवतो. याचंच रुपांतर हळूहळू नैराश्यात होऊ लागतं. ज्या लोकांमध्ये serotonin आणि GABA हे न्युरोट्रान्समीटर्स कमी प्रमाणात असतात, त्यांना असा डिप्रेशनचा त्रास होतो. आहारात योग्य प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ असतील तर या दोन्ही न्युरोट्रान्समीटर्सचं प्रमाण वाढतं आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्समानसिक आरोग्यअन्न