Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय

पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय

How to loose or reduce weight naturally : वेळीच वजनावर नियंत्रण आणले नाही तर आरोग्यासाठी ते घातक ठरु शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 09:40 AM2024-10-14T09:40:38+5:302024-10-15T18:18:32+5:30

How to loose or reduce weight naturally : वेळीच वजनावर नियंत्रण आणले नाही तर आरोग्यासाठी ते घातक ठरु शकते

How to loose or reduce weight naturally : Doctors say 1 easy solution to reduce belly fat and weight, 'like this' be fit | पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय

पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय

वजन वाढणं ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. आपणही वाढत्या वजनाच्या गटात गेलो की आपल्याला नकळतच खूप ताण येतो. मग  हे वाढलेले वजन, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण जीम लावणे, चालणे, योगा क्लास, डाएट असे एक ना एक उपाय करतो. हे उपाय योग्य पद्धतीने आणि नियमित केले तर ठीक नाहीतर कमी व्हायला लागलेले वजन पुन्हा अचानक वाढायला लागते. हे चक्र कायम चालू राहते. बरेचदा हे सगळे उपाय करुनही वजन कमी होतेच असे नाही. वजन वाढलं की आपण बेढब दिसतो, वयस्कर दिसतो, फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत. याशिवाय वाढत्या वजनाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो (How to loose or reduce weight naturally).

 वाढलेल्या वजनामुळे हार्मोन्सचे असंतुलन, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण आणले नाही तर आरोग्यासाठी ते घातक ठरु शकते. याशिवाय जाड असलेल्या अनेकांना आत्मविश्वास कमी असण्याचीही समस्या असते. असे लोक काहीवेळा ऑफीसमध्ये सगळ्यांपेक्षा मागे राहतात. अशा एक ना अनेक गोष्टींवर परीणाम करणारे हे वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध डॉक्टर मानसी मेहेंदळे-धामणकर १ अतिशय सोपा उपाय सांगतात. जीरे, कडीपत्ता आणि जवस हे आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त घटक असून त्यापासून करता येणारा हा उपाय केल्यास वजन झरझर कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर यकृत, किडनी आणि हॉर्मोन्सच्या समस्यांवरही हे तिन्ही फायदेशीर ठरते. त्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...   

सकाळी उठल्यावर न चुकता हे कराच..

सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी जीरे पाणी, कडीपत्त्याचा पानांचा काढा आणि अळशीचा काढा घ्यावा. वाढलेलं वजन कमी होण्यासाठी सलग ३ दिवस यातील एक एक काढा असे रोज घ्यायला हवे. कडीपत्त्याने लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होते त्यामुळे लिव्हरचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. जीऱ्याच्या पाण्याने किडणीचे कार्य सुधारते, किडणीमध्ये रक्त योग्य पद्धतीने घुसळले गेले तर आरोग्य चांगले राहते. तर अळशीचा काढा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आणि हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होते. 



Web Title: How to loose or reduce weight naturally : Doctors say 1 easy solution to reduce belly fat and weight, 'like this' be fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.