Join us  

महिन्याभरात ५ किलो वजन कमी कसं करायचं? AI नं दिलं गमतीदार उत्तर, वेट लॉसचा सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:04 PM

How To Lose 5 kg Weight : वजन कमी करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

आजकाल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात  अनेकजण असतात. सोशल मीडियावर वजन कमी करण्याचे वेगवेगळे डाएट प्लॅन्स व्हायरल होत असतात. (Weight Loss Tips) पण तुम्हाला माहिती आहे का आर्टिफिशियल इंटेलिजेंससुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतो. अलिकडेच AI चॅटबॉटनचं उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (How To Lose 5 kg Weight In One Month AI Give A Funny Answer)

ज्यात एका युजरनं चॅटबॉटला विचारलं होतं की  एका महिन्यात ५ किलो वजन कसं कमी करायचं. याच्या उत्तरात एआयने सांगितले की एका महिन्यात ५ किलो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला  ५ किलो वजन उचलावं लागेल. हे उत्तर ऐकल्यानंतर युजरला हसू आले आणि त्याने म्हटले की हे तर फार गमतीदार उत्तर आहे. (How To Loss Weight)

एआयने म्हटलं की वजन कमी करण्यााठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल आणि हेल्दी लाईफस्टाईल असायला हवी. हे उत्तर लोकांना खूप आवडलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे. वजन कमी करण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही तर तुम्हाला डाएटसुद्धा चांगले घ्यावे लागेल आणि नियमित व्यायाम करायला हवा. 

कॅलरी इन्टेक  कमी करा

वजन कमी करण्यसाठी सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे आपला  कॅलरी इन्टेक कमी करा. याचा अर्थ असा की तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न करतात त्यापेक्षा कमीत कमी कॅलरीजचे सेवन करा. सायकलिंग, कार्डिओ व्यायाम प्रकार करून जास्तीत जास्त  चरबी  जाळण्याचा प्रयत्न करा.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा

हेल्दी डाएट घ्या

आपल्या आहारात फळं, भाज्या, अन्न, लीन प्रोटीनचा समावेश करा. जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि शुगर रिच ड्रिंक्सचा समावेश करू नका.  सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत तुम्ही काय खाता याचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवा. 

पोट लटकतंय, मांड्या जाड दिसतातत? मूठभर मनुके 'या' पद्धतीने खा; झरझर कमी होईल चरबी

नियमित व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. कमीत कमी ३० मिनिटांचा व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीराचे स्नायू मोकळे राहतात. शरीर लवचीक राहते, 

भरपूर प्रमाणात पाणी  प्या

पाणी प्यायल्यानंतर तुमचे शरीर हायड्रेट राहील. याव्यतिरिक्त पाणी शरीरातील घाण बाहेर काढण्यास फायदेशीर ठरते.  वजन कमी करण्यासाठी तुम्हाला पेशंन्स ठेवावे लागतील.   दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी प्यायलाच हवं. यासोबतच ताक, ताज्या फळांचा रस, नारळपाणी या द्रव्याांचा आहारात समावेश करा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स