बऱ्याच जणांच्या बाबतीत हल्ली असं दिसून येतं की त्यांचे हात- पाय तर व्यवस्थित प्रमाणबद्ध असतात. पण पोटाचा भाग मात्र सुटलेला असतो (how to get flat tummy?). बाळंतपणानंतर तर जवळपास सगळ्याच महिलांना हा त्रास छळतो. काही केल्या पोटावरची आणि विशेषत: ओटीपोटावरची चरबी कमी होत नाही. त्यासाठी खरंतर व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे. पण काही जणांना व्यायाम करायला वेळच नसतो, तर काही जणांना व्यायामाचा खूप आळस येतो (how to lose belly fat?). त्यापेक्षा डाएट करून वेटलॉस करण्यावर त्यांचा भर असतो.(easy home remedy to reduce tummy)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय
तुमच्याकडूनही व्यायाम होत नसेल पण पोटावरची चरबी मात्र कमी करायची असेल तर त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेला हा एक उपाय तुम्ही करून पाहू शकता. हा उपाय डॉक्टरांनी Healthy Hamesha या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की लवंग, दालचिनी आणि जिरे हे ३ पदार्थ वापरून पोटावरची चरबी कमी करता येऊ शकते.
प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स
यासाठी सगळ्यात आधी तर लवंग, दालचिनी आणि जिरे हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात एकत्र करा. त्यानंतर ते कढईमध्ये थोडेसे भाजून घ्या. अगदी थोडेसे भाजावेत. त्यानंतर ते थंड झाले की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करा. ही पावडर एका कोरड्या डब्यात भरून ठेवा जेणेकरून ती खराब होणार नाही.
दररोज सकाळी एक टीस्पून पावडर १ ग्लास पाण्यामध्ये घाला आणि हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा. पाणी उकळून जेव्हा तीन चतुर्थांश एवढेच राहील तेव्हा गॅस बंद करा आणि ते पाणी गाळून घ्या. हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट असतानाच प्यावे.
इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...
ज्यांना हे पाणी नुसते तसेच प्यायले जाणार नाही, त्यांनी त्यामध्ये थोडासा मध घालून प्यायले तरी चालेल. हा उपाय केल्यानंतर चयापचय क्रिया अधिक चांगली होते आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. अगदी १५ दिवसांतच खूप चांगला फरक दिसून येऊ लागतो, असं डॉक्टर सांगत आहेत.