लठ्ठपणा (Weight Gain) आजकाल प्रत्येकासाठीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. प्रत्येकजण कंबरेची चरबी, पोटाची चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात असतो. याच प्रयत्नात लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात तर काहीजण जीमला जाऊन घाम गाळतात. पण काही घरगुती उपाय तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. हे उपाय पोटाची चरबी झटपट कमी करू शकतात. यामुळे संपूर्ण शरीराच्या वजनावर सकारात्मक परिणाम होईल. बेली फॅट कमी करण्यासाठी काही खास टिप्सबाबत समजून घेऊ. (Easy Home Remedies To Melt Belly Fat How To Lose Weight)
१) लो फॅट फूड्सचे सेवन करा
पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही लो कॅलरीजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे कंबरेवर फॅट जमा होत नाही. लो कॅलरीजयुक्त पदार्थांमध्ये फळं, भाज्या, अन्नधान्य यांचा समावेश आहे. आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
मेहेंदी फंक्शनसाठी खास आऊटफिट्स; कमी बजेटमध्ये खरेदी करा १० सुंदर-आकर्षक ड्रेस
२) गोड पेय पदार्थांना नाही म्हणा
आजकाल बाजारात गोड आणि कार्बोनेडेट ड्रिंक्स विकले जात आहेत. हे ड्रिंक्स प्यायला बरेच चांगले वाटतात. पण यात जास्त प्रमाणात फॅट असल्यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी जमा होते. याशिवाय सोडा, गोड पदार्थ आणि दूधाचा चहा, कॉफी प्यायल्यानं फॅट वाढतं. हे साखरयुक्त पेय पिणं टाळल्यानं कंबरेची चरबी आपोआप कमी होऊ लागते.
३) हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा
हिरव्या भाज्या, ताजी फळं या पदार्थांना आपल्या आहाराचा एक भाग बनवा. हे फायबर्सनी परीपूर्ण असते. यात कमीत कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीरात जास्त फॅट्स जमा होत नाही मेटाबॉलिझ्म वाढतो आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
४) लीन प्रोटीन
तुमच्या आहारात लीन प्रोटीनचा समावेश करा ज्यामुळे पोट कमी होऊ शकते. या प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये डाळी, नट्स, सिड्सचा समावेश करा ज्यात कमीत कमी कॅलरीजमधून भरपूर प्रोटीन मिळेल आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहील.
५) व्यायाम करायला विसरू नका
डाएटबरोबरच नियमित स्वरूपात व्यायाम केल्यानं तुमचे शरीर निरोगी राहील. रोज क्रंचेज, सिट अप्स यांसारखे व्यायाम करा. ज्यामुळे शरीर टोन्ड होईल आणि कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होईल.