Join us  

पोट सुटले-जाडजूड मांड्या? एक सोपा डाएट प्लॅन, वाढलेली चरबी चटकन होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:15 PM

How to lose weight 5 kg in just 30 days : दीर्घकाळ उपाशी राहिल्यमुळे फक्त मेटाबॉलिझ्म स्लो होत नाही तर अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.  

वजन कमी करण्यासाठी लोक बराचवेळ उपाशी राहतात तर कधी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं नाही तर संतुलित आहार घेण्याची गरज असते. जर तुम्हाला योग्य  प्रकारे वजन कमी करायचे असेल तर कॅलरीज काऊंटकडे लक्ष द्यायला हवं. (Simple Changes That Helped You Lose 5 kg know diet plan)

याशिवाय जास्तवेळ उपाशी राहणंही टाळावे. दीर्घकाळ उपाशी राहिल्यमुळे फक्त मेटाबॉलिझ्म स्लो होत नाही तर अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. जर तुम्ही योग्य डाएट फॉलो केले तर एका महिन्यात सहज ५ किलो वजन कमी करू शकता. डायटिशियन सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to lose weight 5 kg in just 30 days)

वजन कमी करण्यासाठी सोपा डाएट प्लॅन

दिवसाची सुरूवात करताना सगळ्यात आधी एक ग्लास पुदीना किंवा बडिशेपेचं पाणी प्या. हे पाणी प्यायल्यामुळे डायजेशन सुधारते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो यामुळे भूकही कमी लागते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. पुदीना फ्रेशनेस आणि डायजेशनसाठी चांगला असतो. हे दोन्ही पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी याचे सेवन करा.

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

नाश्त्याला काय खायचं?

वजन कमी करण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही व्हेज पनीर सॅण्डवीच खाऊ शकता. यासह ५ भिजवलेले बदाम खा, नाश्ता नेहमी प्रोटीन्सयुक्त असायला हवा. अंड आणि पनीर हे दोन्ही पदार्थ प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. बदाम डायजेशन, हार्ट, स्किन आणि वेट लॉससाठी उत्तम ठरते. याच्या सेवनाने दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते आणि दिवसभर भूकही लागत नाही.

नाश्ता आणि जेवणाच्यामध्ये काय खावं

नाश्ता केल्यानंतर मधल्या वेळेत भूक लागल्यास तुम्ही सिझनल फ्रुट्स खाऊ शकता. यात फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.  खासकरून ज्या लोकांचे पोट साफ होत नाही, इम्यूनिटी कमी आहे. अशा लोकांनी फळांचा आहारात समावेश करायला हवा. 

दुपारचं जेवण

दुपारच्या जेवणात चपाती खा. याशिवाय एक वाटी भरून कोणतीही सिजनल भाजी खा, एक वाटी डाळ आणि जवळपास ८० ग्राम सॅलेड खा, हे एक बॅलेंस मील आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला न्युट्रिशन मिळेल. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा नेहमी संतुलित आहार घ्या. 

पोट, कंबरेच्या टायर्समुळे शरीर जाडजूड दिसतंय? घरी हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी

संध्याकाळच्या वेळी काय खावं

संध्याकाळी १ कप ग्रीन टी आणि त्याबरोबर ३० ग्राम भाजलेले मखाने खा. ग्रीन टी मेटाबॉलिझ्म बुस्ट करते. मखाने आजारांपासून लांब ठेवण्यास मदत  करतात. 

रात्रीच्या जेवणात काय खायचं?

रात्रीच्या जेवणात एक वाटी डाळ खिचडी खा, त्याबरोबर १ वाटी सॅलेडही खाऊ शकता. डाळ खिचडीत तांदळाचे प्रमाण कमी आणि डाळीचे प्रमाण जास्त ठेवा. तुम्ही मूगडाळ, तूरडाळ किंवा मसूर डाळीचाही समावेश जेवणात करू शकता. 

झोपताना हे ड्रिंक प्या

वजन कमी करण्यासाठी रात्री झोपताना बडिशेपेची चहा प्या. यासाठी बडिशेप पाण्यात घालून पाणी अर्ध होईपर्यंत उकळा. नंतर झोपताना या चहाचे सेवन करा. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स