Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

How to lose weight : लवकरात लवकरात लवकर फरक दिसण्यासाठी एक्टिव्ह राहणं गरजेचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 01:05 PM2023-11-04T13:05:19+5:302023-11-04T13:22:35+5:30

How to lose weight : लवकरात लवकरात लवकर फरक दिसण्यासाठी एक्टिव्ह राहणं गरजेचं असतं.

How to lose weight : Easy Ways to Lose Weight Naturally Tips for Weight Loss That Actually Work | पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल

बसून बसून पोट बाहेर येतं, वजन वाढतं अशी तक्रार आजकाल सर्वांनाच जाणवते. वजन वाढल्यामुळे इतर अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. (How to lose weight) फिट राहण्यासाठी काहीजण औषधं घेतात तर काहीजण  स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात.  लवकरात लवकरात लवकर फरक दिसण्यासाठी एक्टिव्ह राहणं गरजेचं असतं.

रोजच्या लाईफस्टाईलमध्ये सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला १० दिवसांत फरक दिसून येईल. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी गोड खाण्याचे प्रमाण कमी करा. साखरेऐवजी मध,  फळं, खजूर अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. (Tips for Weight Loss That Actually Work)

1) वजन कमी करण्यासाठी काय करावे?

भरपूर पाणी पिणं तब्येतीसाठी उत्तम ठरते. रोजच्या धावपळीत लोक पाणी पिण्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण वजन कमी करायचं असल्यास तुम्ही ७ ते ९ ग्लास पाणी प्यायला हवं. पाण्यात शरीराला आवश्यक असलेले टॉक्सिन्स रिलिज होतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. 

तरूणपणातच गुडघे, कंबर दुखणं वाढलं? रोज सकाळी १ लाडू खा-कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल

2) रोज चालायला जा

जेवल्यानंतर अनेकजण थेट झोपतात किंवा एकाच जागी बसून राहतात. या सवयीमुळे तुमचे वजन वाढू शकते. जेवल्यानंतर लगेच वॉक करण्याची सवय लावा. यामुळे अन्न व्यवस्थित पचेल आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. 

3) योग्य डाएट करणं फार  गरजेचे

वजन वाढण्याचं मुख्य कारण रोजच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतात.  भेसळयुक्त पदार्थ, फास्ट फूड यांसारखे पदार्थ आपल्या आहारातून दूर ठेवा. फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन करा. याशिवाय नैसर्गिक साखरयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्या. 

पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा

4) जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करू नका

रोज जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने पोट बाहेर येऊ शकतं. याशिवाय बीपी हाय होण्याची समस्याही उद्भवू शकते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या तर उद्भवतातच याशिवाय  शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते आणि स्नायूंचा विकास व्यवस्थित  होत नाही. 

5) फूड जर्नल तयार करा

रोज तुम्ही काय खाता किती प्रमाणात खाता या गोष्टी फार महत्वाच्या असतात. खाण्यापिण्याचा अंदाज चुकला की लगेच वाढतं किंवा कमी होतं.  एक डायरी मेंटेन करून त्यात तुम्ही रोज खाता, कोणत्या वेळेत खाता या गोष्टी रोज नमूद करा. जेणेकरून १ रूटीन सेट होईल आणि तुम्ही ओव्हर इटींग करणार नाही. 

Web Title: How to lose weight : Easy Ways to Lose Weight Naturally Tips for Weight Loss That Actually Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.