Join us  

तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा परफेक्ट फॉर्म्युला; दिवसभरात कधी - काय खावं पाहा; वजन घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 5:54 PM

How To Lose Weight Fast, According To Experts : व्यायाम करूनही वजन घटत नसेल तर; हा डाएट प्लॅन फॉलो करून पाहा. .

लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे कर्करोग आणि मधुमेहासह अनेक गंभीर आणि घातक रोगांचा धोका वाढतो (Weight Loss). वजन जितक्या वेगाने वाढते तितके ते कमी करण्याचे मोठे आव्हान असते (Fitness). वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि एक प्रभावी मार्ग म्हणजे डाएट फॉलो करणे. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सकस आहार घेतल्याने कमी वेळात वजन कमी करता येते. जर व्यायाम करून वजन कमी होत नसेल तर, पोषणतज्ज्ञ शिखा सिंग यांनी शेअर केलेला डाएट प्लॅन फॉलो करून पाहा. कमी कार्ब आणि उच्च प्रथिनेयुक्त आहाराने वजन सहज कमी करता येईल. कधी, किती वाजता काय खायचे पाहा(How To Lose Weight Fast, According To Experts).

सकाळी ७ वाजता मसाला चहा

सकाळची सुरुवात दुधाच्या चहाऐवजी मसाला चहाने करा. यासाठी लवंग, आले, वेलची, दालचिनी आणि लिंबू घालून मसाला चहा तयार करून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यातील हाय अँटीऑक्सिडंट्स इतर अजरांपासून आपले सरंक्षण करते. आणि वेट लॉससाठीही मदत करते.

बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑर्डर केलं म्हणून मी ब्रेकअप केलं होतं, कारण..रकुल प्रीत सिंग म्हणते..

सकाळी ८ : ३० वाजता ब्रेकफास्ट करा

नाश्त्यात ओट्स आणि कांद्याचे पराठे खा. तेलाऐवजी तुपाचे वापर करा. यासाठी ओट्सचे पीठ तयार करा. त्यात थोडं गव्हाच पीठ घालून मिक्स करा. त्यात आवडीच्या भाज्या किंवा फक्त कांदा घालून कांद्याचे पराठे करा.

लापशी

दुपारच्या जेवणात लापशी खा. त्यात विविध प्रकारच्या भाज्या घाला. भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात.कांदा, मटार, टोमॅटो, गाजर, चीज आणि बीन्स या सर्व भाज्या घालून लापशी तयार करा. यात प्रोटीन आणि फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

५ वाजता ग्रीन टी प्या

सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी ग्रीन टी प्या. यासोबत हेल्दी स्नॅक्स आपण खाऊ शकता. यामुळे पोट भरेल आणि जिभेचे चोचलेही पूर्ण होतील.

डिनरमध्ये सॅलड

रात्रीचे जेवण सायंकाळी ७ वाजेपर्यंत खा. रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. आपण सॅलड खाऊ शकता. सॅलड सिमला मिरची, गाजर, बीन्स, टोमॅटो, टोफू, लेट्यूस आणि ब्रोकोली घालून तयार करा.

घरचे जेवण नको म्हणत मुलं नखरे करतात? ३ जबरदस्त ट्रिक्स; मुलं बाहेरचं खाणं टाळतील

रात्री ९ वाजता दालचीनी चहा

रात्री ९ वाजता दालचिनीचा चहा प्या. उच्च अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेला हा चहा चयापचय बुस्ट करण्यास मदत करतील. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स