आपल्या प्रत्येकच्याच जेवणात वरण-भात असतोच. प्रोटीन्सने परिपूर्ण डाळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. जे लोक लठ्ठपणाने त्रस्त आहे किवा पोटाची चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत ज्यांनी वजन कमी करताना आहारातील काही गोष्टीत बदल करायला हवा. मसूर, मूग, तूर या डाळी फायबर्सचा चांगला स्त्रोत आहेत. (Right Way to Eat Dal Chawal for Weight Loss) यामुळे मेटाबॉलिक रेट सुधारण्यास मदत होते. यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याची प्रोसेस बुस्ट होण्यास मदत होईल. (Eat Dal Chawal in Dinner to Loose Weight)
तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहेत. हे एक सुपर फूड असून वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते. यामुळे पचन क्रियाही चांगली राहते. चणा डाळीत सगळ्यात जास्त कॅलरीज असतात. आहारात तुम्ही मुगाच्या डाळीचा समावेश करू शकता.
१) मूग डाळ तडका
१ कप मूग डाळ, एक कप पाणी, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो, तूप, मोहोरी, लाल मिरच्या, जीरं, हिंग, हल्दी, गरम मसाला, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर हे साहित्य लागेल.
मूग डाळ धुवून पाणी व्यवस्थित गाळून घ्या. मध्यम आचेवर कुकरमध्ये शिजू द्या आणि गरजेनुसार पाणी घाला. २ शिट्ट्या घ्या. २ शिट्ट्या आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर कुकर उघडून डाळ मॅश करून घ्या. नंतर एक कांदा, हिरवी मिरची, आलं, लसणाच्या कळ्या बारीक कापून घ्या आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घ्या.
बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही
फोडणीसाठी एका पॅनमध्ये तूप घालून त्यात राई, लाल मिरची आणि जीरं घाला. आलं-लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. त्यात हिंग आणि चिरलेला कांदा घाला. नंतर टोमॅटोची प्युरी घाला. हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. एक मिनिटं तळून घ्या. त्यानंतर १ कप पाणी आणि मॅश केलेली मूग डाळ घाला. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला. तयार आहे मूग डाळ तडका.
२) पालक, मेथी-डाळ
चण्याची डाळ, कसूरी मेथी, पालक प्युरी, जीरं, हिंग, कांदा, आलं, लसणाची पेस्ट, गरम मसाला आणि धणे पावडर, तेल, मीठ हे साहित्य लागेल. प्रेशर कुकरमध्ये चण्याची डाळ आणि पाणी घाला. ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या नंतर गॅस बंद करा. कढईत तूप घालून त्यात जीरं, कसुरी मेथी आणि हिंग घालून परतून घ्या.
प्रोटीनसाठी खूप महाग डाएट कशाला? जेवणाच्या ताटात 'हे' ७ पदार्थ असू द्या-भरपूर प्रोटीन मिळेल
त्यात चिरलेला कांदा, आलं-लसणाची पेस्ट घाला २ मिनिटं परतून घ्या. गरम मसाला, धणे पावडर आणि मीठ मिसळा. त्यानंतर पालक प्युरी आणि पाणी घाला त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. त्यात मॅश केलेली डाळ आणि पाणी घालून ५ मिनिटं शिजू द्या. त्यानंतर गरमागरम डाळ भात किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा.