फूल फॅट दूध, तूप भारतात जास्त खाल्ले जाते. याशिवाय जंक फूडचं अति सेवन गंभीर समस्यांचे कारण ठरते. यामुळे पोटावर एक्स्ट्रा चरबी जमा होत जाते. ज्याला बेली फॅट (Belly Fat) असं म्हणतात. व्यायाम आणि डाएट बेली फॅट घटवण्याचा उत्तम उपाय आहे. पण धावपळीच्या जीवनात वेट लॉससाठी व्यायाम करायला फारसा वेळ मिळत नाही. अशात तुम्ही वेट लॉस ड्रिंक (Weight Loss Drink) पिऊन बेली फॅट कमी करू शकता. हे ड्रिंक धण्यांपासून बनवते जाते. ज्यामुळे पटापट वजन कमी होण्यास मदत होते. (How to loss belly fat)
धण्यांमध्ये असे कंम्पाऊंड्स असतात. जे लिपिड मेटाबॉलिझ्म कमी करतात. यामुळे फॅट, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड न तुटता मल बाहेर पडतो यामुळे पोटावर अतिरीक्त चरबी जमा होत नाही.(How to Lose Weight With Coriander Water) धण्याच्या बियांचा दुसरा फायदा असा की यामुळे मेटाॉलिझ्म वेगात वाढते. यामुळे शरीरातील फॅट्स एनर्जीमध्ये रुपांतरीत होतात. जास्त फॅट बर्न झाल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. (How to burn fat)
धण्याचं पाणी कसं तयार करायचं?
1 चमचे धणे धुवून घ्या, आता त्यांना 1 ग्लास पाण्यात भिजवा, हा ग्लास झाकून रात्रभर राहू द्या. सकाळी उठल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. कारण यावेळी तुमचं पोट सकाळी रिकामं असतं आणि एनर्जीसाठी कोणताही सोर्स नसतो. यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होतात. धण्याचं पाणी प्यायल्यानं तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. वेट लॉससोबत शरीरही हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे डिहायड्रेश, हिट एग्जॉश्न, हिट स्ट्रोकपासून बचाव होतो.
१) धण्यांचे पाणी पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. हे पाचक अग्नीवर नियंत्रण ठेवते आणि पोटातील आम्लता पातळी वाढण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे पोटदुखी, जळजळ, गॅस इत्यादी पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
२) धण्यांचे पाणई वजन कमी करण्यास मदत करते. या पाण्यात एक घटक आढळतो जो चयापचय प्रक्रियेला गती देतो. यामुळे शरीरात साठलेली चरबी बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
३) थायरॉइडची कमतरता किंवा जास्त होणे या दोन्ही समस्यांमध्ये कोथिंबीरीचे पाणी फायदेशीर मानले जाते. वास्तविक, कोथिंबीरमध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात, जे थायरॉईड संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करतात.