Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्यायाम न करताही कमी होईल वजन! फक्त काहीही खाण्याआधी लक्षात ठेवा ५ गोष्टी...

व्यायाम न करताही कमी होईल वजन! फक्त काहीही खाण्याआधी लक्षात ठेवा ५ गोष्टी...

Weight Loss Tips Without Exercise: वजन वाढतच चाललंय आणि व्यायामाला वेळच नाही... अशी अडचण असेल तर काहीही खाण्याआधी या काही गोष्टी लक्षात ठेवा.. वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 05:29 PM2022-08-12T17:29:23+5:302022-08-12T17:35:16+5:30

Weight Loss Tips Without Exercise: वजन वाढतच चाललंय आणि व्यायामाला वेळच नाही... अशी अडचण असेल तर काहीही खाण्याआधी या काही गोष्टी लक्षात ठेवा.. वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल.

How to lose weight without exercise? 5 tips to reduce weight. How to control weight? | व्यायाम न करताही कमी होईल वजन! फक्त काहीही खाण्याआधी लक्षात ठेवा ५ गोष्टी...

व्यायाम न करताही कमी होईल वजन! फक्त काहीही खाण्याआधी लक्षात ठेवा ५ गोष्टी...

Highlightsखाल्ल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा खाताना किंवा खाण्याच्या आधी या काही गोष्टी लक्षात ठेवा. वजन कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल.

वाढतं वजन ही अनेकांना त्रस्त करणारी समस्या.. बरं आपलंही वजन कमी व्हावं, आपणही स्लिम- ट्रिम दिसावं (Simple way for weight loss) असं खूप वाटतं. पण त्यासाठी कराव्या लागणाऱ्या २ गोष्टींमध्ये मात्र आपण कमी पडतो. एक म्हणजे व्यायाम आणि दुसरं म्हणजे खाण्यावर कंट्रोल (weight loss without any exercise and diet).. आवडते खाद्यपदार्थ एकदा समोर दिसले की मग ना वाढलेलं वजन (weight gain) आठवतं ना त्यामुळे बिघडत जाणारी फिगर. मग खाल्ल्यानंतर या गोष्टी आठवतात आणि खूप त्रास होतो. म्हणूनच तर खाल्ल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा खाताना किंवा खाण्याच्या आधी या काही गोष्टी लक्षात ठेवा. वजन कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल.(for weight loss remember these 5 tips before eating anything)

 

वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे व्यायाम. पण आवडीने व्यायाम करणाऱ्यांची संख्या खरंच खूप कमी असते. बऱ्याच जणांना व्यायामासाठी खरोखरंच वेळ मिळत नाही, तर अनेक जणांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्याकडून व्यायाम होत नाही. खरंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. पण तरीही तुमच्याकडून व्यायाम होत नसेल, पण वजन मात्र कमी करायचं असेल तर काहीही खाण्याआधी या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे वजन नक्कीच आटोक्यात राहण्यास फायदा होईल. या टिप्स इन्स्टाग्रामच्या simratkathuria या पेजवर शेअर करण्यात आल्या असून सिमरत या डाएट एक्सपर्ट आहेत. 

 

या गोष्टी लक्षात ठेवा..
१. थोडं पोट रिकामं ठेवा

कधीही जेवताना ही गोष्ट लक्षात ठेवा. पोट अगदी टम्म भरेपर्यंत कधीही जेवू नये. तुम्हाला जेवढी भूक असेल त्याच्या ८० ते ८५ टक्केच जेवा. बऱ्याचदा आवडीचे पदार्थ समोर आले की आपला ताबा सुटतो आणि मग पोट भरलं तरी मनाचं समाधान न झाल्याने आपण भरपूर खातो. अशी सवय तात्काळ सोडा आणि कितीही आवडीचा पदार्थ समोर आला तरी पोटात जागा शिल्लक राहील, या हिशोबानेच जेवण करा.

 

२. विनाकारण खाऊ नका
जेवण झालेलं असताना, पोट व्यवस्थित भरलेलं असताना विनाकारण काहीतरी तोंडात टाकायची सवय अनेकांना असते.

पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..

समोर आलं की टाकलं तोंडात ही सवय सोडा. जेवण झाल्यानंतर काहीही खात असाल किंवा चहा- कॉफी जरी घेणार असाल तरी ते खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे का की उगाच समोर आलंय किंवा इच्छा झाली म्हणून आपण खातोय, हे आधी स्वत:ला विचारा. खरोखरंच भूक लागली असेल तरच खा.

 

३. फायबर जास्त घ्या
आहारात फायबरयुक्त पदार्थ अधिक घेतल्याने वजन आटोक्यात राहण्यास निश्चितच मदत होते. कारण आहारात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आणि पचन या दोन्ही क्रिया व्यवस्थित राहतात. या दोन्ही क्रियांचे कार्य उत्तम असले की आपोआपच शरीरात चरबी साचण्याचे प्रमाण कमी होते आणि वेटलॉससाठी त्याचा फायदा होतो. यासाठी फळं आणि सलाड अधिक प्रमाणात खावे. 

 

४. भरपूर पाणी प्या
पाणी भरपूर प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स निघून जातात. तसेच भूकेवरही आपोआप कंट्रोल होतो. 

रिमझिम पावसात प्या गरमागरम व्हेजिटेबल सूप, शेफ कुणाल कपूर देतात ५ टिप्स, प्या पोटभर
५. ८ तासांची झोप 
जास्त झोपलं तर जास्त वजन वाढतं असं उगाच काही जणांचा गैरसमज असतो. दुपारची झोप टाळा पण रात्रीची झोप ७ ते ८ तासांची घ्या. कारण यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. 


 

Web Title: How to lose weight without exercise? 5 tips to reduce weight. How to control weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.