सध्याच्या काळात वाढते वजन ही एक कॉमन समस्या (How To Lose Weight Without Losing The Glow) झाली आहे. वाढलेलं वजन सगळ्यांनाच सतावत. वजन वाढू नये यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. आपले वजन नियंत्रणात येऊन आपण योग्य शेपमध्ये किंवा बारीक दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. यासाठीच सगळे आपलं वजन कमी (How to keep skin glowing while losing weight) करण्याच्या मागे असतात. आपल वाढलेल वजन कमी करताना आपल्याला अनेक समस्यांचा किंवा अडचणींचा सामना करावा लागतो, यापैकीच एक समस्या म्हणजे वजन कमी करताना आपल्या त्वचेवरील नैसर्गिक ग्लो हरवून जातो(Maintain Your Face Glow After Weight Loss By Following Tips).
बरेचदा आपण पाहिले असेल की, वजन कमी झाल्यावर आपण बारीक होतो, पोटाची ढेरी देखील आत जाते पण त्वचेवरील नैसर्गिक गुलाबी ग्लो कायमचा हरवून जातो. वजन कमी करताना योग्य ते डाएट, एक्सरसाइज करुन आपण वजन कमी करतो. वजन कमी केल्याने आपल्या चेहऱ्यात अनेक बदल झालेले दिसतात. चेहऱ्यात बदल झाल्याने आपला लूक पूर्णपणे बदलून जातो. चेहरा आधीपेक्षा तुलनेने बारीक दिसू लागतो. परंतु इतके सारे बदल होण्याबरोबरच चेहऱ्याचा ग्लो देखील कमी होतो. परिणामी, चेहरा थकलेला, काळवंडलेला आणि निस्तेज दिसू लागतो. अशावेळी आपले वजन कमी होऊन आपण चांगल्या शेपमध्ये येतो परंतु त्वचेवरील ग्लो हरवल्याने लुक्स खराब दिसतो. यासाठीच आपले वजन कमी करताना त्वचेचा ग्लो हरवू नये यासाठी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) काही खास टिप्स सांगत आहेत. या टिप्स कोणत्या ते पाहूयात.
त्वचेवरील नैसर्गिक ग्लो हरवू न देता वजन कसे कमी करावे...
१. योग्य पद्धतीने वजन कमी करावे :- सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांनी वजन कमी करताना त्वचेवरील नैसर्गिक ग्लो हरवू नये यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स फॉलो करुन आपण त्वचेवरील नैसर्गिक ग्लो हरवू न देता देखील आपण वजन अगदी सहज सोप्या पद्धतीने कमी करु शकतो. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची चमक न गमावता वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला दीर्घकाळ टिकेल किंवा दिर्घकाळ करता येईल अशा डाएट, एक्सरसाइज किंवा रुटीन फॉलो करुनच वजन कमी करावे लागेल, अशा पद्धतीने वजन कमी केल्यास त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कमी न होऊ देता देखील आपण वजन कमी करु शकतो. २० दिवसात तुमचे २० किलो वजन कमी होणे आवश्यकच नाही. त्यापेक्षा तुम्हाला वर्षभरात फक्त ५ ते १० किलो वजन कमी करणे अगदी सोपे जाईल. यामुळे तुमच्या शरीराची रचना चांगली राहील आणि तुमच्या त्वचेची चमकही कमी होणार नाही. अशा पद्धतीने वजन कमी केल्यास त्वचेचा ग्लो कमी होणार नाही सोबतच कमी केलेलं वजन पुन्हा वाढणार देखील नाही. यासाठी अमुक इतक्या दिवसांत अमुक इतके झटपट वजन कमी करा अशा उपायांचा काहीच उपयोग नसतो. योग्य पद्धतीने आणि नियम पाळून वजन कमी केल्यास कमी केलेलं वजन तितकेच जास्त टिकते, ते पुन्हा भराभर वाढत नाही.
वजन कमी होऊन चेहऱ्यावर येईल ग्लो, अनेक समस्यांवर एक उपाय, ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हा’ चमचाभर रस...
२. कायम एक्सरसाइज करत राहा :- आपण बरेचदा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करतो. परंतु एकदा का वजन कमी झाले की आपण पुन्हा 'जैसे थे' म्हणजेच एक्सरसाइज करणे सोडून देतो. कित्येकदा आपण वजन कमी करण्यापुरताच एक्सरसाइज करतो. एकदा का वजन आटोक्यात आले की एक्सरसाइज करणेच सोडून देतो. यामुळे देखील आपल्या त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कमी होऊ शकतो. यासाठीच वजन कमी करण्यासाठी जसा एक्सरसाइज करता त्याचप्रमाणे वजन कमी झाल्यावर देखील एक्सरसाइज करणे सोडू नका, यामुळे त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहण्यास मदत मिळते.
३. आहार मर्यादित ठेवा :- वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज सोबतच डाएट देखील तितकेच महत्वाचे असते. यासाठी वजन कमी करताना डाएटकडे देखील विशेष लक्ष द्यावे. वजन कमी करताना कार्बोहायड्रेट आणि साखर पूर्णपणे सोडून देऊ नका. यासोबतच, वजन कमी करताना एक्सरसाइज सोबतच आपल्या डाएटची देखील विशेष काळजी घ्यावी. वजन कमी करताना बाहेरचे तेलकट, तुपकट किंवा पॅकेजिंग केलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे वजन आणि तुमच्या पोटाची ढेरी वाढत नाही. यासोबतच, तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक चमकही कायम राहते. यासाठी वजन कमी करताना सर्वात आधी तुमच्या आहाराकडे पूर्ण लक्ष द्या.