Join us  

पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:42 PM

How To Loss 5 Kg In A Month (Vajan kami karnyache upay) :  हे ३ रूल्स तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.

वाढतं वजन, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, लिव्हर डॅमेज यांसारख्या आजारांचे कारण ठरते. यासाठी वेळीच वजनावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. (How To Loss 5 Kg In A Month) वेट लॉस करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाऊन वर्कआऊट आणि एक्सरसाईज करू शकता.  सध्याच्या दिवसांत  ८०-१०-१० डाएटचा क्रेझ खूपच वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी हा नवीन डाएट ट्रेंड चांगला वाढला आहे. डॉ. डगल ग्राम यांनी  लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी या डाएटचा शोध लावला. (How To Loss Weight In a Month Follow 80-10-10 Diet Plan To Lose Weight Faster)

न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशिनय शिखा अग्रवाल शर्मा यांनी  हे डाएट करून एका महिन्यात ५ किलो वजन कसं करायचं याबाबत सांगितले आहे. एक्सपर्ट्सच्या मते ८० टक्के डाएट फॉलो करा आणि १० टक्के हेल्दी ऑपश्नची निवड करा. १० टक्के आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करा.  हे ३ रूल्स तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.

या डाएटमध्ये तुम्हाला  ८० टक्के कार्बोहायड्रेट, १० टक्के प्रोटीन्स आणि १० टक्के फॅटचे सेवन करावे लागते.  या डाएटमध्ये दिवसाची सुरूवात फळं खाऊन करू शकतात. पहिल्या मीलमध्ये हिरव्या भाज्या, सॅलेडचा समावेश करा. ज्यामुळे भरपूर पोषण मिळते आणि शरीर डिटॉक्स होते. 

८०-१०-१० डाएटचे फायदे

डाएटमध्ये लो फॅट आणि कोलेस्टेरॉल असल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका उद्भवतो.   लो कॅलरी आणि हाय फायबर्सयुक्त फळं, भाज्य मेटाबॉलिझ्म सुधारून वजन कमी करण्यास मदत करतात. या डाएटमध्ये नॅच्युरल शुगरचे प्रमाण जास्त असते.  जेव्हा हे फळांमध्ये फायबर्सबरोबर मिक्स होते तेव्हा ब्लड शुगर कंट्रोल होणं सोपं होतं. 

या प्रकारचे डाएट केल्याचे नुकसान

डाएट प्लॅनमध्ये फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे हॉर्मोन्स संतुलन आणि ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. शरीरात फॅटी एसिड आणि काही अमिनो एसिड, बी-१२ यांसारख्या व्हिटामीन आणि आयर्न, जिंक, कॅल्शियम यांसारख्या मिनरल्सची कमतरता भासते. दीर्घकाळ  फॉलो केल्याने मसल मास लॉस आणि बोन डेंसिटी कमी होऊ शकते.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा

व्यायाम करणं गरजेचं

एक्सपर्ट्सच्यामते हे डाएट फॉलो करताना तुम्ही एरोबीक्स आणि आठवड्यातून ३ वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम करू  शकता. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल याचा अर्थ असा की डाएटही व्यवस्थित फॉलो करत नाही आहात.

ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

महत्वाची पोषक तत्व मिळवण्यासाठी डाएटमध्ये फळं, भाज्या, सुका मेवा, बीयांचा समावेश करा. पोषण संबंधित समस्या दूर करण्यसाठी ब्लड लेव्हल चेक करत राहा. शरीरातील बदलांकडे लक्ष द्या. थकवा, कमकुवतपणा जाणवत असेल तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स