Join us  

१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 12:01 PM

How To Loss Weight In A One Month : दुपारच्या जेवणात मिलेटची खिचडी खा. यात तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता.

वजन कमी (Weight Loss Tips)  करण्यासाठी बरेच लोक धडपडत असतात पण प्रत्येकालचा यश मिळतं असं नाही. काही लोक तक्रार करतात की त्यांचे वजन कमीच होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट किंवा वर्कआऊट रूटीन फॉलो करू शकता.  काही लोक कमी दिवसांतच वजन कमी करतात ज्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. डाएट किंवा वर्कआऊट रूटीनमध्ये बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (How To Loss Weight In A One Month)

महिन्याभरात ४ ते ५ किलो वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी खास डाएट सांगितले आहे. तुम्ही किती वेळात किती वजन घटवता हे हेल्थ कंडीशन आणि अन्य कारणांवर निर्भर असते. याबाबत डायटिशियन राधिका गोयल यांनी अधिक माहिती दिली आहे. त्या सर्टिफाईड डायटिशियन आणि न्युट्रिशनिस्ट आहेत. (How To Loss Weight In A One Month)

वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरूवात कशी करावी? (How To Start Day For Weight Loss) 

डाएटिशिनयने सांगितलेल्या वेट लॉस प्लॅनने वजन कमी करणं अधिकच सोपं होतं  वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्या. यासोबत ५ भिजवलेले बदामही खा, धण्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्यास मेटाबॉलिक रेट वाढतो. धण्यांमध्ये एंटी  ऑक्सिडेंस् असतात. ज्यामुळे शरीरातील फ्रि रॅडिकल्स कमी होतात आणि आजारांपासून बचाव होतो.

युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाच्या रिपोर्टनुसार बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. बदाम खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला ताकद मिळते.  पोट भरलेलं राहतं आणि अन्हेल्दी खाण्याच्या क्रेव्हिंग्स होत नाहीत.  भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होण्यास मदत होते.

नाश्त्याला एका छोट्या प्लेटमध्ये पोहे  खाऊ शकता. यासबोबत दही खा. भाज्या न्युट्रिशन आणि फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. सफरचंदात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.  भाजलेले चणे खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.  ज्यामुळे रक्ताची कमतरताही दूर होते. 

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात मिलेटची खिचडी खा. यात तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता. यासोबत तुम्ही पालकाचा रायता खाऊ शकता. मिलेट्स वजन कमी करण्यासही मदत करतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक न्युट्रिएंट्स मिळतात. संध्याकाळी स्प्राऊंट्स सॅलेड खा. 

पोट कमी करायचंय-पण डाएट नको? रोज किती चपात्या खाव्यात याचं सोपं गणित पाहा; स्लिम राहाल

रात्रीचे जेवण

रात्रीच्या जेवणात एका ज्वारीच्या भाकरीबरोबर सोयबीनची भाजी आणि चणा डाळ खा. झोपताना  साय नसलेल्या दुधात हळद घालून प्या.  ज्यामुळे आजारांपासून बचाव होतो आणि इंसुलिन रेजिस्टंसही कमी होतो. रात्रीचं जेवण ८ च्या  आत करा. तुम्ही जितके लवकर जेवाल तितका जास्त वेळ अन्न पचण्यासाठी मिळेल. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य