Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

How to maintain weight after losing it : The 6 Best Ways to Maintain Weight Loss : वजन कमी करण्यासाठी खूप मेहेनत तर घेतो पण ते मेंटेन कस करावं हा प्रश्न असतो, यासाठीच घ्या खास टिप्स....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 09:37 AM2024-07-02T09:37:37+5:302024-07-02T09:37:55+5:30

How to maintain weight after losing it : The 6 Best Ways to Maintain Weight Loss : वजन कमी करण्यासाठी खूप मेहेनत तर घेतो पण ते मेंटेन कस करावं हा प्रश्न असतो, यासाठीच घ्या खास टिप्स....

How to maintain weight after losing it The 6 Best Ways to Maintain Weight Loss | वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

वाढतं वजन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. चुकीचे खाणे आणि शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्यामुळे वजन वाढण्याची समस्या झपाट्याने वाढताना दिसते. वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. वाढलेलं वजन कमी करणे हे फारसं सोपं काम नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज करणे महत्वाचे असते. या दोन्ही गोष्टी अत्यंत (How to maintain weight after losing it) काटेकोरपणे पाळल्या तर आपण अगदी सहजरित्या (6 techniques to avoid weight regain) वजन कमी करु शकतो. वजन कमी करण्यासाठी आपण हे प्रयत्न करुन एकवेळ वजन कमी करु शकतो. परंतु हे कमी केलेलं वजन कायम तेवढंच मेंटेन कसं करावं हा प्रश्न अनेकांना सतावतो(The 6 Best Ways to Maintain Weight Loss).

 

वाढलेलं वजन कमी करणं हे काम आव्हानात्मक असू शकतं, हे आम्ही जाणतो. मात्र, त्याहून आव्हानात्मक गोष्ट कोणती असेल तर ती आहे कष्टपूर्वक कमी केलेलं वजन मेंटेन करणं. कारण, वजन एकदा कमी केलं म्हणजे ते पुन्हा वाढणारच नाही, असं होत नाही. वजन वाढण्याची प्रोसेस सुरु राहू शकते. त्यासाठीही आपल्याला काही गोष्टी कराव्या लागू शकतात(How to maintain weight after losing it).

कमी केलेलं वजन कसे मेंटेन करावे ? 

१. एकदा का आपले वजन कमी झाले की आपण व्यायाम करणे सोडून देतो. ही एक मोठी चूक आहे म्हणून व्यायाम करण्याची सवय सोडू नका. वजन मेंटेन करण्यासाठी सतत ऍक्टीव्ह राहा. रोज फिजीकल ऍक्टीव्हीटी करत राहा. कारण त्या तुम्हाला कॅलरी बर्न करण्यास आणि मसल्स मास मेंटेन करण्यास मदत करतात.

२. वजन कमी केल्यानंतर, आपल्याला असे वाटते की आता आपण डाएट सोडून आपल्याला जे हवंय ते सगळं काही खाऊ शकतो. यामुळे आपण जुन्या खाण्याच्या सवयी पुन्हा सुरु करतो. परंतु हे चुकीचे आहे. वजन कमी केले तरी डाएट आणि खाण्याच्या सवयी कायम फॉलो करत राहा. भरपूर फळे, भाज्या, धान्य, लीन प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स खाणं गरजेचं आहे. प्रोसेस्ड फूड्स, शुगर असलेले ड्रिंक्स आणि सॅच्यूरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ टाळा. कारण ते वजन वाढण्यास आणि आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा आपण बाहेरील जंक आणि फास्ट फूड खाणे टाळतो. परंतु एकदा वजन कमी केले की आपण ते परत खाणे सुरु करतो, असे अजिबात करू नका. 

दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

३. झोपेची कमतरता हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. वजन मेंटेन करण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाची असते. कारण झोपेच्या अभावामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, यामुळे आपल्याला सारखी भूक लागू शकते किंवा काहीतरी खाण्याचे क्रेविंग्स होऊ शकतात.  

४. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते, यामुळे शरीर हायड्रेट राहते. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा चयापचयावर परिणाम होतो आणि वजन कमी करण्यात अडचणी निर्माण होतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते आणि जास्त खाणं टाळता येतं.

८५ वर्षांच्या आहेत अभिनेत्री हेलन, पाहा त्या करतात तो भन्नाट व्यायाम, फिटनेसचं सिक्रेट...

५. एकदा का वजन कमी झाले तरीही तुमच्या वजनाकडे नियमित लक्ष देत राहा. वजनातील चढ - उतार होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. आपलं वजन विविध घटकांनी प्रभावित होऊ शकतं. मात्र, जर तुमचं वजन सतत वाढतं असेल, असं तुम्हाला वाटलं तर मात्र, तुम्हाला ते कमी करण्यासाठी आणखी कष्ट घ्यावे लागू शकतात.

६. कमी केलेलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला त्याच निरोगी सवयींचे सातत्याने पालन करणं आवश्यक आहे. ज्या सवयी तुम्हाला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरल्या त्या सवयींचे पालन कायम करत राहा.  

खरंच, जस्सी जैसी कोई नही! अवघ्या ६ महिन्यांत मोना सिंगने १५ किलो वजन कमी केलं...

Web Title: How to maintain weight after losing it The 6 Best Ways to Maintain Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.