सकाळच्या आरोग्यदायी पथ्यांमध्ये ॲलोव्हेरा ज्यूस (aloe vera juice) पिण्याच्या सवयीचा आवर्जून समावेश होतो. कोरफडच्या ज्यूसद्वारे शरीरास ॲण्टिऑक्सिडेण्ट्स, क, अ, ई ही जीवनसत्वं, फोलिक ॲसिड, बीटा केरोटीन, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम (benefits of aloe vera juice) हे महत्वाचे घटक मिळतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोरफडचा ज्यूस पिणं फायदेशीर मानलं जातं.. कोरफडचा ज्यूस सध्या सर्व मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतो. कोरफड ज्यूस हा बाहेर तयार विकत मिळत असला तरी तो घरच्याघरी (homemade aloe vera juice) ताजा ताजा करता येतो. असा ताजा रस आरोग्यास जास्त फायदेशीर असतो. घरच्याघरी कोरफड ज्यूस करणं ( how to make aloe vera juice at home) हे अवघड काम नाही.
Image: Google
घरच्याघरी कोरफड ज्यूस
घरच्याघरी कोरफड ज्यूस करण्यासाठी कोरफडची ताजी पात घ्यावी. ती पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यावी. कोरफड पातीची वरची आणि खालची बाजू 1 ते 2 इंच कापावी. कोरफडच्या पातीतून निघणारा पिवळसर चिकट द्राव काढून टाकावा. हा द्राव आरोग्यास आणि त्वचेस फायदेशीर नसतो. कोरफडचा चकचकीत गर चाकूनं खरवडून काढावा. मिक्सरच्या भांड्यात कोरफडचा गर घ्यावा. त्यात पाणी आणि लिंबाचा रस घालावा. मिक्सरमधून ही सामग्री फिरवून घ्यावी. हा ज्यूस एका ग्लासमध्ये काढून प्यावा. कोरफडचा हा रस हवाबंद बाटलीत फ्रिजमध्ये ठेवून साठवता येतो. मात्र कोरफडचा ताजा ताजा ज्यूस करुन पिणं आरोग्यास जास्त फायदेशीर असतो.
Image: Google
कोरफड ज्यूस का प्यावा?
घरी तयार केलेला कोरफडचा ताजा ज्यूस आरोग्यास अनेक फायदे मिळवून देणारा असतो. 1.कोरफड ज्यूसमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स भरपूर प्रमाणात असतात. कोरफड ज्यूस हा त्वचा आणि आरोग्याचं मुक्त मुलकांपासून (फ्री रॅडिकल्स) रक्षण करतो.
2. कोरफड ज्यूसमधील ॲण्टिऑक्सिडण्ट्स, जीवनसत्वं आणि खनिजं त्वचेसाठी लाभदायक असतात. कोरफड ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्वचेचा रंग उजळतो . कोरफड ज्यूस चेहेऱ्यास लावणंही फायदेशीर असतं.
3. पचन व्यवस्था सुदृढ राहाण्यासाठी कोरफड ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. कोरफडमध्ये नैसर्गिक रेचक गुणधर्म असतात. त्यामुळे कोरफड ज्यूस नियमित प्यायल्यास पचनाशी निगडित समस्या दूर होतात.
4. अपचन होणं, बध्दकोष्ठता, गॅसेस होणं या पोटाशी निगडित समस्या कोरफड ज्यूस प्यायल्याने दूर होतात.
5. मधुमेही रुग्णांसाठी कोरफडचा ज्यूस फायदेशीर ठरतो. कोरफड ज्यूसमधील गुणधर्म इन्शुलिनची संवेदनशिलता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.