Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्या गोकर्णाच्या फुलांचा चहा, ब्ल्यू टी तब्येतीसाठी बहुगुणी- पावसाळ्यासाठी खास औषधी सुंदर निळा चहा

प्या गोकर्णाच्या फुलांचा चहा, ब्ल्यू टी तब्येतीसाठी बहुगुणी- पावसाळ्यासाठी खास औषधी सुंदर निळा चहा

Gokarna Flower Tea Recipe: आपल्या सभोवती असणाऱ्या अनेक वनस्पती, फुलं, पानं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणूनच तर अनेक आयुर्वेदिक उपचारांसाठी  (ayurvedic remedies) त्यांचा वापर केला जातो. हे एक फुल त्यापैकीच एक आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 04:37 PM2022-07-13T16:37:04+5:302022-07-13T16:37:54+5:30

Gokarna Flower Tea Recipe: आपल्या सभोवती असणाऱ्या अनेक वनस्पती, फुलं, पानं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणूनच तर अनेक आयुर्वेदिक उपचारांसाठी  (ayurvedic remedies) त्यांचा वापर केला जातो. हे एक फुल त्यापैकीच एक आहे..

How to make blue tea? Health benefits of Ayurvedic Gokarna tea, Butterfly pea flower tea recipe  | प्या गोकर्णाच्या फुलांचा चहा, ब्ल्यू टी तब्येतीसाठी बहुगुणी- पावसाळ्यासाठी खास औषधी सुंदर निळा चहा

प्या गोकर्णाच्या फुलांचा चहा, ब्ल्यू टी तब्येतीसाठी बहुगुणी- पावसाळ्यासाठी खास औषधी सुंदर निळा चहा

Highlightsगोकर्णाचा उपयोग कसा करून घ्यायचा, त्याचा आरोग्यवर्धक काढा कसा तयार करायचा, याची माहिती

सध्या पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी फुलून येणारा वेल म्हणजे गोकर्ण. गोकर्णाचा वेल (gokarna flower) लावण्यासाठी किंवा तो वाढविण्यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. गोकर्णाची शेंग सुकली की त्यातल्या बिया वाऱ्याने अलगद उडतात आणि ज्या ठिकाणच्या मातीत पडतात, त्या ठिकाणी अगदी सहज रुजतात. अगदी सहज आपल्या आसपास उगवणारी ही वनस्पती आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी तर उपयुक्त आहेच, पण आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे. गोकर्णाचा उपयोग कसा करून घ्यायचा, त्याचा आरोग्यवर्धक काढा (How to make blue tea from gokarna) कसा तयार करायचा, याची माहिती इन्स्टाग्रामच्या finefettlecookerys या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. 

 

कसा करायचा गोकर्णाचा चहा (Butterfly pea flower tea recipe)
रेसिपी १

- गोकर्णाचा चहा करण्यासाठी एक कप गरम पाणी, गोकर्णाची ७ ते ८ फुलं आणि रेड रॉक शुगर असं साहित्य लागणार आहे.
- यासाठी एका भांड्यात एक कप उकळलेलं कडक पाणी घ्या.
- या पाण्यात गोकर्णाची फुलं तोडून टाका. त्यापुर्वी फुलांचं हिरवं देठ काढून टाका. 
- अर्ध्या लिंबाचा रस त्यात पिळा.
- रेड रॉक शुगर विरघळेपर्यंत हे मिश्रण चांगलं हलवून घ्या.
- आता हा काढा गाळून घ्यावा आणि प्यावा.
- थंड किंवा गार जसा आवडेल तसा हा काढा किंवा चहा पिऊ शकता. शिवाय तो कोणत्याही ऋतूमध्ये प्यायला तरी चालतो.

 

रेसिपी २
- यासाठी आपल्याला १० ते १२ गोकर्णाची फुलं, एक चमचा गवती चहाची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा मध किंवा गुळ, एक इंच आलं, चिमुटभर मिरे पावडर आणि दिड ग्लास पाणी लागणार आहे. 
- एका पातेल्यात मध आणि लिंबू सोडून इतर सगळं साहित्य टाका आणि उकळून घ्या. 
- साधारण दिड ग्लास पाणी आटून एक ग्लास होईपर्यंत ते उकळावे.
- यानंतर चहा कपमध्ये गाळून घेतल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मध किंवा गुळ टाका. 
- व्यवस्थित हलवून घ्या आणि हा चहा गरमागरम प्या. 

 

गोकर्णाच्या फुलांचा औषधी उपयोग
- गोकर्णामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, लोह भरपूर प्रमाणात असतो.
- मानसिक तणाव, थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त.
- पावसाळ्यात, हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी- खोकला त्रासांवर गुणकारी ठरतो.
- स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
- केसांच्या समस्या कमी होतात.

स्वीटकॉर्न पाणी घालून उकडता? बघा तज्ज्ञांनी सांगितलेली योग्य पद्धत, पोषक तत्व मिळतील भरपूर
- ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.
- हा चहा नियमित प्यायल्यास रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेचे विकार आपोआपच कमी होतात.
- बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणून हा चहा ओळखला जातो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही या चहाचा उपयोग होतो. 

 

Web Title: How to make blue tea? Health benefits of Ayurvedic Gokarna tea, Butterfly pea flower tea recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.