Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > स्टार्स - सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय ? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं...

स्टार्स - सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय ? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं...

Bulletproof Coffee : Bollywood celebrities famous morning energy drink is bulletproof coffee : अनेक सेलिब्रिटी पितात ती बुलेटप्रूफ कॉफी नेमकी बनवायची कशी ते पाहुयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 01:56 PM2024-06-24T13:56:14+5:302024-06-24T14:13:12+5:30

Bulletproof Coffee : Bollywood celebrities famous morning energy drink is bulletproof coffee : अनेक सेलिब्रिटी पितात ती बुलेटप्रूफ कॉफी नेमकी बनवायची कशी ते पाहुयात...

How To Make Bulletproof Coffee For Weight Loss Bulletproof Coffee Bulletproof Coffee Benefits | स्टार्स - सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय ? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं...

स्टार्स - सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय ? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं...

अनेकजणांना सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पिण्याची सवय असते. गरमागरम कॉफी प्यायल्याशिवाय काहींच्या दिवसाची सुरुवात होतच नाही. कॉफी प्यायल्याने फ्रेश तर वाटतेच, सोबतच वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊनच करतात. कॉफीचे अनेक प्रकार असतात. काही लोकांना दुधाची कॉफी प्यायला आवडते तर काहींना ब्लॅक कॉफी आवडते. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार कॉफी बनवून पिणे पसंत करतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये बुलेटप्रूफ कॉफीचा समावेश करण्याविषयी सांगतात. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये 'बुलेटप्रूफ कॉफी' (Bulletproof Coffee) पिण्याचा एक (Ghee Coffee & Its Benefits) नवा ट्रेंड सुरु आहे. कृति सेनन, अदिति राव हैदरी, रकुल प्रीत यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री बुलेटप्रूफ कॉफी आवडीने पितात(Bollywood Celebrities Secret Drink For Weight Loss).

बुलेटप्रूफ कॉफी (All Celebrities Favorite Bulletproof Coffee) ही उत्तम क्वालिटीच्या कॉफीच्या बियांनी तयार केली जाते. हि कॉफी बनवताना आपण यात योग्य प्रमाणांत तूप किंवा बटर घालू शकता. तूप मिक्स करुन तयार केलेली ही कॉफी पिणे आरोग्याला फायदेशीर ठरते. अनेक सेलिब्रिटी पितात ती बुलेटप्रूफ कॉफी नेमकी बनवायची कशी ते पाहुयात(Bollywood celebrities famous morning energy drink is bulletproof coffee).  

बुलेटप्रूफ कॉफी कशी बनवायची ? 

एका कॉफी मगमध्ये १ टेबलस्पून कॉफी घेऊन त्यात १ टेबलस्पून तूप घालावे. आता या कॉफी आणि तुपाच्या मिश्रणात गरम पाणी ओतावे. त्यानंतर चमच्याने व्यवस्थित ढवळून तूप व कॉफी पाण्यांत मिक्स करुन घ्यावे. अशाप्रकारे बुलेटप्रूफ कॉफी पिण्यासाठी तयार आहे. या कॉफीला 'बटर कॉफी' किंवा 'किटो कॉफी' असे देखील म्हटले जाते.   

विद्या बालन करते  'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?  

बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे फायदे :- 

१. बुलेटप्रूफ कॉफी तुम्हाला दिवसभर फ्रेश, फोकस आणि ताज-तवान राहण्यास मदत करते. 
२. शरीरातील पचन संस्थेचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. 
३. आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यास देखील मदत करते. 
४. ज्यांना सारखी भूक लागते, खाण्याचे क्रेविंग्स होतात त्यांनी ही कॉफी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते. 
५. या कॉफीतील तुपाने अन्न पचवण्याच्या प्रक्रियेचा वेग हा कमी केला जातो, ज्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही. 
६. तूप हे शरीराच्या आरोग्यासाठी कायमच उत्तम मानलं जातं. त्याचे असंख्य फायदे आहेतच. पण तूप आणि बुलेट कॉफी हे कॉम्बिनेशन खूपच उत्तम आहे. याचा वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो.

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

कोणतीही गोष्ट अती प्रमाणात ही घातकच असते. त्यामुळे 'बुलेटप्रूफ कॉफी' दिवसांतून फक्त दोन वेळाच पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. जर आपण ही कॉफी अधिक प्रमाणांत घेतली तर वजन कमी होण्याऐवजी जास्तच वाढण्याची शक्यता असते. ही कॉफी अधिक प्रमाणांत प्यायल्याने आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये देखील बिघाड होऊ शकतो.

Web Title: How To Make Bulletproof Coffee For Weight Loss Bulletproof Coffee Bulletproof Coffee Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.