Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व

महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व

Benefits of Eating Curd- Rice or Dahi- Bhat: आपल्या प्रथा- परंपरा यांनाही शास्त्रीय आधार नक्कीच आहे. म्हणूनच तर वाचा की महालक्ष्मीच्या विसर्जनाला (Mahalaxmi Visarjan) केल्या जाणाऱ्या दही भाताच्या नैवेद्याचं महत्त्व काय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 02:31 PM2022-09-05T14:31:07+5:302022-09-05T14:32:20+5:30

Benefits of Eating Curd- Rice or Dahi- Bhat: आपल्या प्रथा- परंपरा यांनाही शास्त्रीय आधार नक्कीच आहे. म्हणूनच तर वाचा की महालक्ष्मीच्या विसर्जनाला (Mahalaxmi Visarjan) केल्या जाणाऱ्या दही भाताच्या नैवेद्याचं महत्त्व काय.

How to make dahi bhat naivedya for Mahalaxmi? Benefits of eating curd- rice or dahibhat, Curd rice for weight loss | महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व

महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व

Highlightsभातामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. तर दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम अधिक चांगले होण्यास मदत होते.

महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरींचं आज विसर्जन होत आहे. मागील कित्येक दिवसांपासून घरातल्या महिलांची या सणासाठी (Mahalaxmi festival) लगबग  सुरू असते. आज महालक्ष्मीचं विसर्जन आणि हळदी- कुंंकू कार्यक्रम झाल्या की त्यांना निरोप द्यायचा. या दिवशी आपापल्या  प्रथा- परंपरा यानुसार महालक्ष्मीसाठी वेगवेगळा नैवेद्य (naivedya) केला जातो. पण सगळ्या नैवेद्यांमध्ये एक सारखाच पदार्थ असतो आणि तो म्हणजे दहीभात. महालक्ष्मीसारख्या मोठ्या सणाला दहीभाताचं महत्त्व का (Curd rice for weight loss)? दहीभात खाल्ल्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे  होतात? (Benefits of eating curd- rice or dahibhat)

 

दहीभात खाण्याचे फायदे
१. दह्यामध्ये शरीरासाठी पोषक ठरणारे अनेक चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे मुख्य जेवणानंतर जर थोडा दहीभात खाल्ला तर जेवण पचायला फायदा होतो. त्यामुळेच बऱ्याच जणांकडे पुरणाचं जेवण झालं की सगळ्यात शेवटी दही भात खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे जड जेवण पचायला मदत होते. 

'पापा कहते है....' नवरीचं वडिलांवरचं प्रेम पाहून डोळ्यात येईल पाणी, लेक सासरी जाताना.. व्हायरल व्हिडिओ

२. भातामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. तर दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम अधिक चांगले होण्यास मदत होते.

 

३. दहीभात खाल्ल्याने मासिक पाळीतली पोटदुखी कमी होण्यासही मदत होते.

४. उष्णता वाढली असेल, पोटात जळजळ होत असेल, जुलाब होत असतील तर अशावेळीही दहीभात खाणे फायद्याचे ठरते. 

५. दह्यामध्ये असणाऱ्या काही पौष्टिक घटकांमुळे मानसिक ताण कमी करून मन शांत होण्यास मदत होते. शरीरातला दाह कमी करण्यासाठीही दहीभात खाणे उपयुक्त मानले जाते.

 

दहीभात करण्याची रेसिपी
- ताज्या भातामध्ये आवडीनुसार दही, मीठ, थोडीशी साखर टाकून कालवून घ्या. 
- काही ठिकाणी या भातात थोडीशी साय घातली जाते. आवडत असेल तर साय घाला.
- छोट्या कढईत तुपाची फोडणी करा. त्यात जिरे, मोहरी, हिंग, लाल किंवा हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घाला आणि ही फोडणी भातावर टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतले की दहीभात तयार. 

 

Web Title: How to make dahi bhat naivedya for Mahalaxmi? Benefits of eating curd- rice or dahibhat, Curd rice for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.