Join us  

तरुणपणात कंबर-गुडघे दुखू लागले? रोज १ लाडू खा,कॅल्शियम-प्रोटीन मिळेल, बळकट होतील हाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:34 PM

How to Make Energy Booster Ladoo : ताकद वाढवण्यासाठी  केमिकल्सयुक्त उत्पादनं घेण्यापेक्षा घरच्याघरी पौष्टीक लाडू बनवून तुम्ही हाडं मजबूत  ठेवू शकता.

कंबर, पाठ, गुडघे  शरीराचे असे भाग दुखत असल्यास आहार चांगला घेऊन ते दुखणं कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. (Healthy Ladoo Recipe) पौष्टीक लाडू दुखणं कमी करण्यासाठी अनेकदा खाल्ले जातात. ताकद वाढवण्यासाठी  केमिकल्सयुक्त उत्पादनं घेण्यापेक्षा घरच्याघरी पौष्टीक लाडू बनवून तुम्ही हाडं मजबूत  ठेवू शकता. (Mixed Seeds Ladoo Recipe)

भोपळ्याच्या बीया, आळशीच्या बीया, आपल्या सर्वांच्याच घरी असतात. (Nuts and Seeds Laddu Recipe) या बियांच्या सेवनाने तब्येत शरीराला भरपूर फायदे मिळतात. नुसत्या बीया खायच्या म्हटलं तर नको वाटतात. त्यापेक्षा या बियांचा वापर करून बिना साखरेचे पौष्टीक लाडू बनवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण आवडीने खातील. (How to make high Protein ladoo) पौष्टीक लाडू घरी कसे बनवायचे ते पाहूया.

साहित्य 

तीळ- २ वाटी

आळशीच्या बीया- १ वाटी

भोपळ्याच्या  बीया- १ वाटी

टरबूजाच्या बीया- १ वाटी

सुर्यफुलाच्या बीया- १ वाटी

खजूर- १० ते १२

गूळ- अर्धा ते १ कप

तूप- ४ ते ५ चमचे

पाणी- अर्धा कप

वेलची पावडर- १ ते २ चमचे

मीठ -  अर्धा चमचा

कृती (Recipe of High Protein Ladoo)

१) कढईत तीळ गरम करून एका ताटात काढून घ्या. त्यानंतर आळशीच्या बीया ताटात काढून भाजून घ्या. टरबुजाच्या बीया, भोपळ्याच्या बीया गरम करून  एका ताटात काढून घ्या.  एका वाटीत खजूर काढून त्यात पाणी घालून कुस्करून घ्या. त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्या. 

१ महिना भात न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, तज्ज्ञ सांगतात भात न खाण्याचे परिणाम

२) एका कढईत तूप घालून त्यात खजूराचं दळलेलं मिश्रण घालून जाडसर पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट भाजलेल्या बियांच्या मिश्रणात घाला. चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकत्र करून लाडू वळून घ्या. तयार आहेत बियांचे लाडू हे लाडू खाल्ल्याने ताकद मिळेल आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

बीया खाण्याचे फायदे (What is the health benefit of eating seeds)

आळशीच्या, भोपळ्याच्या बीयांमध्ये एंटीऑक्सिडंस्,  मॅग्नेशियम, फाबर्स आणि व्हिटामीन्स असतात  ज्यामुळे डायबिटीसचा धोका टळतो. याशिवाय भोपळ्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत  राहते.  आयर्नने परिपूर्ण  भोपळ्याच्या बीया दिवसभर शरीराला एनर्जेटीक ठेवतात. बीयांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते. याशिवाय  प्रोटिन्सची कमतरताही भरून निघते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सअन्न