Join us  

ब्रेकफास्ट विथ ग्रीन डोसा.. वजन कमी करताना खावा असा प्रोटीनयुक्त हिरवागार चविष्ट पदार्थ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 7:32 PM

How to make green dosa: सकाळच्या हेल्दी नाश्त्याचे फायदे मिळवण्यासाठी ग्रीन डोसा खाणं हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन डोसा आहे इफेक्टिव्ह!

ठळक मुद्देग्रीन डोसा करण्यासाठी अख्खे मूग किंवा मुगाची डाळ घ्यावी. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं.ग्रीन डोसा नाश्त्याला खाल्ल्यास दिवसभराच्या खाण्याला शिस्त लागते.फायबर आणि प्रथिनं या दोन्ही गरजा ग्रीन डोसा खाऊन भागवता येतात. 

How to make green dosa: वजन कमी करायचं तर आहार तज्ज्ञ म्हणतात की सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नये. सकाळी नाश्त्याला काय खातो यावर आपलं वजन कमी होतं की वाढतं हे अवलंबून असतं. वजन कमी करताना आरोग्याला दुर्लक्षून चालणार नाही.  वजन आणि आरोग्य हातात हात घालून चालतात. वजन कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे पौष्टिक नाश्ता. पौष्टिक नाश्ता म्हणजे फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेला नाश्ता. सकाळच्या पहिल्या आहारात खाल्ला जाणारा पदार्थ हा फायबर आणि प्रथिनांनी संपन्न असला तर दिवसभरच्या खाण्याला शिस्त लागते. अशा प्रकारच्या नाश्त्याने दिवसभर भूक भूक होत नाही. त्यामुळे अरबट चरबट खाणं टाळलं जातं आणि वजन वाढण्याचा धोका टाळला जातो. सकाळच्या नाश्त्याने हे फायदे मिळवण्यासाठी ग्रीन  डोसा खावा असं आहार तज्ज्ञ सांगतात.  

Image: Google

सकाळी नाश्त्याला ग्रीन डोसा खाणे म्हणजे फायबर आणि प्रथिनं यांचा योग्य डोस शरीरास मिळवून देणे. ग्रीन डोसा खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. पोट भरलेलं राहातं. सकाळचा हा ग्रीन डोसा दिवसभर शरीर आणि मन उत्साही ठेवतं . ग्रीन डोसा हा वजन कमी करण्यास फायदेशीर आहे, म्हणजे तो बेचव लागत असेल असा समज करुन घेण्याचं कारण नाही. ग्रीन डोशाचे तिहेरी वैशिष्ट्यं आहे. ग्रीन डोसा हा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो, आरोग्यास आवश्यक ते पोषण मुल्यं पुरवतो आणि तो चविष्ट देखील असतो. ग्रीन डोसा हेल्दी आणि टेस्टी करण्याची पध्दत आहे. त्या पध्दतीने तो केल्यास सकाळच्या नाश्त्याला रोज ग्रीन डोसा असला तरी कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही. 

Image: Google

कसा कराल ग्रीन डोसा?

ग्रीन डोसा करण्यासाठी 2 वाटी अख्खे मूग किंवा सालीची मुगाची डाळ , अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी बारीक रवा, 10-12 पालकाची ताजी पानं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडं आलं, चवीपुरती मीठ, आवडत असल्यास थोडं ताक, पाव वाटी सोया पीठ, थोडी जवसाची पूड, जिरे, तीळ, आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल घ्यावं. 

ग्रीन डोसा करण्यासाठी अख्खे मूग किंवा मुगाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवावे. ते भिजले की मिक्सरच्या भांड्यात निथळलेली मुगाची डाळ, तांदूळ, पालकांची पानं ( व्यवस्थित धुवून, चिरुन घेतलेली), जिरे, मीठ, ताक, सोया पीठ, रवा, मिरची, आलं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते बारीक वाटावं. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मिश्रण जास्त पातळ आणि जास्त घट्टही नको.

Image: Google

डोशाचं मिश्रण खोलगट चमच्यानं फेटून घेतलं की ते10-15 मिनिटं झाकून ठेवावं. मग नाॅन स्टिक तवा गरम करावा. आधी त्याला तेल लावून तवा पाण्यानं पुसावा. मग तव्यावर मिश्रण घालून डोसे करावेत. डोसे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. तेलाचा थोडा वापर करावा. डोसे दोन्ही बाजूंनी चांगले भाजावेत. हे डोसे टमाट्याच्या चटणीसोबत छान लागतात.  मोठे असल्यास 2 डोसे लहान आकाराचे असल्यास 3 डोसे सोबत चटणी खाल्ल्यास पोट भरतं आणि कामाची ऊर्जा मिळते. 

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य