तंदुरुस्त राहण्यासाठी बरेच जण विविध गोष्टी करतात (Weight Loss). योग, व्यायामशाळेत जाऊन घाम गाळणे, या गोष्टी करतात. तर काही जण जॉगिंग करून वेट लॉस करतात (Protien Drink). तंदुरुस्त आणि आकर्षक बॉडी दिसण्यासाठी लोक व्यायामासोबत प्रोटीन पावडरचे देखील सेवन करतात (Fitness). पण बाजारात प्रोटीन पावडर जास्त महाग मिळते.
प्रोटीन पावडरमुळे शरीराला योग्य आकार मिळतो. प्रोटीन शेक आणि नियमित व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहते, आणि स्नायू तयार करण्यास मदत मिळते. जर आपल्याला बाजारात मिळणारी विकतची प्रोटीन पावडर घ्यायची नसेल तर, घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार करा. यामुळे आरोग्याला इतरही लाभ मिळतील(How to make instant Chana Sattu Powder at home for weight loss).
प्रोटीन पावडरचे शरीराला मिळणारे फायदे
- सत्तू हे कोरड्या भाजलेल्या हरभऱ्यापासून बनवलेले पारंपारिक भारतीय पीठ आहे. प्रोटीन पावडर म्हणून आपण सत्तू पावडरचे सेवन करू शकता. यात प्रोटीनचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्याशिवाय मका, बार्ली आणि धान्य इत्यादीपासूनही सत्तू बनवला जातो.
- सत्तू पावडरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होणार नाही.
- सत्तू पावडरमध्ये प्रोटीन आणि फायबर व्यतिरिक्त फायबर, कर्बोदके, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने आढळतात.
पावसाळ्यात दही खावं? कधी खावं सकाळी की रात्री? सर्दी-खोकला होण्याची भीती वाटते?
- जर आपल्याला उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर, आपण सत्तू पावडरचे सेवन करू शकता. यातील पौष्टीक घटकांमुळे आरोग्याला याचा फायदाच होतो.
- सत्तू पावडर अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही, व वेट लॉस होण्यास मदत मिळते.
प्रोटीन ड्रिंक कसं तयार करायचं?
- सर्वात आधी भाजलेले चणे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, वा त्याची पावडर तयार करा. अशा प्रकारे झटपट सत्तू पावडर म्हणजेच प्रोटीन पावडर रेडी.
जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत
- प्रोटीन ड्रिंक तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा सत्तू पावडर घ्या. त्यात अर्धा चमचा जिरे पावडर, पुदिना, २ चमचे लिंबाचा रस आणि कोमट पाणी घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपली घरगुती प्रोटीन ड्रिंक पिण्यासाठी रेडी.