Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

Summer Special: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही खास माहिती... (summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 03:44 PM2024-04-24T15:44:43+5:302024-04-24T17:37:20+5:30

Summer Special: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही खास माहिती... (summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke)

How to prevent body odour in summer, summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke | घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

Highlightsउन्हामुळे किंवा वाढत्या उष्णतेमुळे होणारे वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये कोणते बदल करावेत किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत कोणते पदार्थ आवर्जून खावे?

उन्हाळ्याचा कडाका आता सगळीकडेच वाढला आहे. काही ठिकाणी तर तापमान केव्हाच चाळिशीच्या पुढे गेले आहे. या दिवसांत अंगातली उष्णताही खूप वाढते. तसेच कडक उन्हात घराबाहेर पडल्याने उष्माघाताचा त्रासही होतो. याशिवाय खूप जास्त घाम येऊन शरीराला दुर्गंधी येणे (How to prevent body odour in summer), डिहायड्रेशन होऊन तोंड कोरडे पडल्यासारखे होणे, शरीराची आतून आग- आग होते आहे असे वाटणे, सतत घाम आल्याने डोक्यातूनही केसांचा कुबट वास येणे, असे अनेक त्रास सुरू होतात. (summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke)

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ३ उपाय

 

उन्हामुळे किंवा वाढत्या उष्णतेमुळे होणारे वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये कोणते बदल करावेत किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत कोणते पदार्थ आवर्जून खावेत, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही माहिती एकदा बघा. 

१. कडुलिंबाच्या पानांचा उपाय

उन्हाळ्यात खूप घाम येतो. काही जणांना घामही खूप येतो आणि त्यांच्या घामाचा दुर्गंधही खूप जास्त असतो. म्हणूनच ऋजुता यांनी कडुलिंबाच्या पानांचा उपाय सांगितला आहे.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नयेत ही ६ फळं

तुमच्या आंघोळीच्या पाण्यात कढीपत्त्याची मुठभर पाने टाका आणि थोडावेळ ती पाण्यात तशीच भिजू द्या. यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे घाम येण्याचं, अंगाच्या दुर्गंधीचं प्रमाण तर कमी होईलच. शिवाय डोक्यातला कोंडा, केसांना येणारा कुबट वास आणि चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स यांचं प्रमाणही खूप कमी होईल.

 

२. दही किंवा ताक

दुपारच्या जेवणात दही किंवा ताक हे पदार्थ आवर्जून घ्यावेत. कारण या पदार्थांमुळे शरीराला थंडावा मिळतो.

मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

शिवाय बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारच्या जेवणानंतर सुस्ती येते. म्हणूनच जर दही किंवा ताक हे पदार्थ आहारात असतील तर सुस्ती येण्याचे प्रमाण कमी होते. 

 

३. वाळ्याचं पाणी

वाळ्याचं पाणी उन्हाळ्यात पिण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. माठात तुम्ही थोडा वाळा टाकून ठेवा.

कॅल्शियमचा सुपरडोस असणारे ५ चटपटीत पदार्थ, मुलंही आवडीने खातील- हाडं दणकट होतील

आणि ते पाणी उन्हाळ्यात प्या. यामुळे शरीर थंड राहण्यास तर मदत होतेच, पण तोंडाला दुर्गंधी येत असल्यास ती ही कमी होते. 

 

Web Title: How to prevent body odour in summer, summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.