Join us  

वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 9:00 AM

Prevent Hairfall When On a Weight Loss Programme : वजन कमी करता करता केसांची आणि त्वचेची वाट लागली तर करुन पाहा हे खास उपाय...

हेल्दी व फिट अँड फाईन राहण्यासाठी आपले वजन नियंत्रणात असणे महत्वाचे असतेच. आपल्यापैकी बरेचजण आहेत ज्यांचे वजन जास्त आहे व ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. अनेकवेळा त्यांचे वजन कमी होते, पण त्यासोबतच त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. बहुतेक लोकांना वेटलॉस करताना त्यांच्या वेटलॉस जर्नीदरम्यान केस गळतीचा अनुभव (Prevent Hairfall When On a Weight Loss Programme) हा आलाच असेल. वेटलॉस करताना केसगळतीच्या समस्येला अनेकजणांनी तोंड दिले असेल. अशावेळी एकीकडे वजन कमी होत असल्याचा आनंद असतो तर दुसरीकडे केसगळतीचे दुःख ही होत असते(How do I stop my hair from falling out when I lose weight?).

कमी वेळेत वजन कमी करण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे कधीकधी त्वचा आणि केसांवर (How to Prevent Hair Loss When Losing Weight) याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, वेटलॉस जर्नी दरम्यान असा केसगळतीचा (PREVENT HAIR LOSS WHILE LOSING WEIGHT) त्रास होऊ शकते. हे प्रमाण तात्पुरते असते. शरीरावरील ताण कमी होताच, केस गळणे थांबते. केसांची वाढ पुन्हा सामान्यपणे सुरू होते. असे असले तरीही वेटलॉस दरम्यान केसगळती होऊ नये म्हून काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(5 Ways To Prevent Hair Loss While Losing Weight).

वेटलॉसचा त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून... 

१. क्रॅश डाएट करणे टाळा :- वजन कमी करताना केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण अचानक क्रॅश डाएट घेणे सुरू करतो. यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. असे असले तरीही क्रॅश डाएट घेत असताना कॅलरी काउंट बर्‍याच प्रमाणात कमी होतो. क्रॅश डाएट केल्यामुळे आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या महत्वाच्या पोषक तत्वांचा समावेश करू शकत नाही, आणि यामुळेच केस गळायला लागतात. त्यामुळे वजन कमी करताना क्रॅश डाएट घेणे टाळावे. त्यापेक्षा संतुलित आहार घेऊन नियमित व्यायाम करावा.

वेटलॉससाठी गव्हाच्या पिठाऐवजी खा ४ प्रकारच्या पौष्टिक पिठाच्या पोळ्या, वजनात फरक दिसेल झटपट...

२. योग्य प्रमाणांत प्रोटिन्स घ्या :- वजन कमी करताना आपल्या शरीराला जास्त प्रमाणांत प्रोटिन्सची गरज असते. जेव्हा आपण वजन कमी करताना वर्कआऊट करतो तेव्हा शरीराला अनेक पोषक घटकांसोबतच  प्रोटिन्सची अधिक गरज असते. यासाठीच आपण आहारात दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, शेंगदाणे, पनीर, टोफू यांसारख्या हाय प्रोटीनरिच पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा.     

कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...

३. हायड्रेटेड रहा :- आपले वजन कमी होत असताना, दिवसभरात आपण किती पाणी पितो याकडे लक्ष देणे गरजेचे असते. या काळात जर आपण कमी पाणी प्यायल्यात तर आपले शरीर डिहायड्रेटेड होऊ शकते. जेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणावर डिहायड्रेशन होते तेव्हा केस भरपूर प्रमाणात गळतात. त्यामुळे वजन कमी करताना भरपूर पाणी पिऊन दिवसभर हायड्रेटेड रहा. 

४. डॉक्टरांचा सल्ला घ्या :- जर आपल्याला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. जेणेकरून आपल्याला  केस गळणे किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे हाच उत्तम मार्ग असेल. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या डाएटिशियन किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्याल, तेव्हा ते फक्त वजन कमी करणेच सोपे करत नाही तर आपल्याला सर्व आवश्यक पोषक तत्त्वे कशी  मिळतील याबद्दल देखील मार्गदर्शन करतात. 

नारळ पाण्यात १ चमचा घाला हे इटूकलं बी, वजन कमी करायची एकदम सोपी युक्ती...

५. केसांची योग्य ती काळजी घ्या :- वेटलॉस जर्नी दरम्यान केस गळू नयेत म्हणून केसांची जास्त काळजी घेणं गरजेचे असते. आपल्या केसांचा प्रकार लक्षात घेऊन सल्फेट फ्री शैम्पू आणि कंडिशनर वापरावे. यासोबतच स्कॅल्पच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी हेअर मास्क लावू शकता. केसांची काळजी घेण्यासाठी खूप घट्ट हेअरस्टाईल, हीट स्टाइलिंग उत्पादने किंवा केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्स वापरणे टाळा.

वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

टॅग्स :वेट लॉस टिप्सकेसांची काळजी