पोट सुटलं की तुमची पर्सनॅलिटी खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचा आकार बदलतो इतकंच नाही तर लूक सुद्धा बिघडतो याशिवाय गंभीर आजारही पसरतात. अनेकजण खाल्ल्यानंतर पोटावर हात फिरवतात. असं म्हटलं जातं की जेवल्यानंतर लगेच पोटावर हात फिरवल्यानं पोट बाहेर येतं पण खरंच यात काही तथ्य आहे का? खरंच जेवल्यानंतर पोटावर हात फिरवल्यानं पोट बाहेर येतं का समजून घेऊ (How to reduce belly fat)
जेवल्यानंतर पोटावर हात फिरवल्यानं पोट बाहेर येतं का?
एक्सपर्ट्सच्या मते या गोष्टीत काहीही तथ्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार पोटावर हात फिरवल्यानं शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही. पोट बाहेर येण्याचं मुख्य कारणं खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे. जर फिजिकल एक्टिव्हिटी, वर्कआऊट कमी झाले असेल तर याचा परिणाम पोटावर दिसून येतो. म्हणूनच हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्दी डाएटचा आपल्या दिनचर्येत समावेश करायला हवा. (Health tips does rubbing stomach after eating reason of belly know to expert)
जे लोक जेवल्यानंतर पोटावर हात फिरवतात त्याचं पोट सुटलेलं दिसून येतं. त्याचं शरीर अस्वस्थ असल्याचे हे संकेत असू शकतात. म्हणूच व्यायाम आणि आहार महत्वाचा असतो. आळस देणं हे गंभीर आजार होण्याचं कारण मानलं जातं. काही लोक असं मानतात की पोटावर हात फिरवल्यानं मांसपेशी लूज होतात आणि त्यात फॅट्स जमा होतात. ज्यामुळे पोट बाहेर येतं. यात पूर्णपणे तथ्य नाही.
पोट कमी करण्याचे उपाय
१) खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवा, नियमित व्यायाम करा. बाहेरचे पदार्थ-तळळेले, पॅकेज्ड फूड खाऊ नका, जेवल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका, जेवल्यानंतर लगेच न झोपता थोडावेळ वॉक करा.
२) आपण दिवसभरात जे काही खातो. म्हणजेच कमी खातो किंवा कधी कधी जास्त खातो. खाताना अन्नातील पोषक तत्वांकडे लक्ष दिलं जात नाही. जिभेचे आवडते म्हणून तेलकट तिखट पदार्थ जास्त खाल्ले जातात. हे टाळून तुम्ही काय खाता किती प्रमाणात खाता याचा रेकॉर्ड ठेवा. प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटसचं डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.