Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम

पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम

How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : सगळे करुनही पोटाचा घेर कमी झाला तर ठिक पण तो कमी झालाच नाही तर मात्र आपण फार निराश होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 02:55 PM2022-10-06T14:55:09+5:302022-10-06T15:11:07+5:30

How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : सगळे करुनही पोटाचा घेर कमी झाला तर ठिक पण तो कमी झालाच नाही तर मात्र आपण फार निराश होतो.

How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : To reduce the increased circumference of the stomach? Drink 1 special tea daily; Stay fit forever | पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम

पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा? प्या रोज १ खास चहा; राहा तंदुरुस्त कायम

Highlightsरात्रीचे जेवण ८ वाजण्याच्या आधी घ्यायला हवे, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कपालभाती हा प्राणायमातील अतिशय चांगला उपाय असून रोज १००० कपालभाती केल्यास त्याचा चांगला फायदा होतो

आपण जाड होतो म्हणजे अनेकदा आपल्या पोटाचा आणि कंबरेचा घेर वाढत जातो. एकदा हा घेर वाढत गेला की तो काही केल्या कमी होत नाही. मग पोट कमी करण्यासाठी कधी जीम लावून भरपूर व्यायाम करणे किंवा कधी कडक डाएट प्लॅन फॉलो करणे असे प्रकार केले जातात. असे सगळे करुनही पोटाचा घेर कमी झाला तर ठिक पण तो कमी झालाच नाही तर मात्र आपण फार निराश होतो. पोट वाढलेलं तब्येतीसाठी तर चांगलं नसतंच पण त्यामुळे आपल्या फॅशनवरही बरीच बंधने येतात. पोटामुळे आपल्याला स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे तर घालता येतच नाहीत पण कोणतेही कपडे घातले तरी हा घेर काही केल्या झाकला जात नाही. मग आपण नैराश्यात जातो. आता वजन कमी करण्यासाठी आणि पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार एक सोपा उपाय सांगतात (How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea). 

चहाची आगळीवेगळी रेसिपी

१. एका पातेल्यात कपभर पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवा.

२. त्यामध्ये आल्याचा तुकडा, १ चमचा बडीशोप, अर्धा चमचा ओवा आणि १ काळी मिरीची पूड घाला. १ वेलची आणि १ तुकडा दालचिनीची पूड घाला. 

३. १० कोथिंबीरीची पानं किंवा कोथिंबीर नसेल तर १० धणे घाला. 

४. हे सगळे ३ ते ४ मिनीटे चांगले उकळू द्या त्यानंतर गाळून घ्या.

५. ग्लासमध्ये मिश्रण गाळल्यानंतर त्यात अर्धे लिंबू पिळा आणि रिकाम्या पोटी हा चहा प्या.  


सोबत हे उपाय अवश्य करा

१. न चुकता रोज १२ सूर्यनमस्कार घाला. हार्मोन्सचे संतुलन राहण्यासाठी, मेटाबॉलिझम चांगला राहण्यासाठी हा अतिशय चांगला उपाय असतो. मानसिक संतुलन, झोपेचे गणित आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. 

२. कपालभाती हा प्राणायमातील अतिशय चांगला उपाय असून रोज १००० कपालभाती केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि पोटावरची चरबी कमी होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. बॉडी डीटॉक्स होण्यासाठी आणि पाळीच्या तक्रारी दूर होण्यासाठीही हा उत्तम उपाय आहे. 

३. सूर्योदयापूर्वी रात्रीचे जेवण करा. आपण अनेकदा संध्याकाळी चहा घेतल्यानंतर रात्रीचे जेवण ९ किंवा १० वाजता करतो. पण यामुळे आपल्या पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीचे जेवण ८ वाजण्याच्या आधी घ्यायला हवे. 

४. कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे केवळ पोटावरची चरबी कमी होते असे नाही तर शरीरावर वाढलेली सगळीच चरबी कमी होण्यास याची मदत होते. तसेच यामुळे गॅसेस, अपचन, जडपणा कमी होण्यास मदत होते. 

Web Title: How To Reduce Belly Fat With Ayurveda Tea : To reduce the increased circumference of the stomach? Drink 1 special tea daily; Stay fit forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.