Join us  

ऑफिसमधून घरी गेल्यावर खूप गळाल्यासारखं वाटतं? दुपारी ४ नंतर १ गोष्ट आठवणीने करा- थकवा पळून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 12:05 PM

Diet Tips For Working Women: ऑफिस संपवून घरी गेल्यानंतर खूप थकवा येत असेल, घरी जाऊन काही काम करण्याची ताकद अंगात राहात नसेल तर दुपारी ४ ते ६ दरम्यान एक गोष्ट आठवणीने करा...(how to reduce stress and fatigue after full day office)

ठळक मुद्देदुपारी ४ ते ६ ही अशी वेळ असते की तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी नैसर्गिकपणेच वाढलेली असते.

वर्किंग वुमन म्हटलं की तिला थकवा येऊन चालतच नाही. कारण तिच्यावर जसं तिचं घर अवलंबून असतं तशीच तिच्या ऑफिसची कामंही. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांवर कायम तिला उत्साहाने लढावंच लागतं. थकणं, गळून जाणं असं काही तिच्या बाबतीत झालंच तर तिची सगळीच कामं कोलमडून जातात. पण बऱ्याच तरुण वर्किंग वुमनच्या बाबतीत असं होतं की त्या ऑफिस संपवून घरी गेल्या की अगदी गळून जातात (Diet Tips For Working Women). घरातलं कोणतंच काम करवत नाही एवढा थकवा येतो. असं रोजच होत असेल तर त्यावर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक खास उपाय सांगितला आहे (how to reduce stress and fatigue after full day office). तो उपाय नेमका कोणता ते पाहा... (simple remedies to keep you fresh after office hours)

 

तुम्हालाही ऑफिसमधून घरी गेलं की खूप थकवा येतो?

दुपारनंतर ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून घरी गेल्यानंतर येणारा थकवा घालविण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की दुपारी ४ ते ६ ही अशी वेळ असते की तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी नैसर्गिकपणेच वाढलेली असते.

आषाढी एकादशीला करा उपवासाची मऊ, लुसलुशीत इडली- बघा झटपट होणारी सोपी रेसिपी

त्यामुळे या वेळेत जवळपास सगळ्यांनाच थोडी भूक लागते. दिवसभराच्या कामाचा ताणही आलेला असतो आणि थकवाही असतोच. त्यामुळे या वेळेला थोडं का असेना पण काहीतरी पौष्टिक पदार्थ आठवणीने खा. यामुळे कोर्टिसोलची पातळी पुन्हा खाली येण्यास मदत होते आणि तुमची स्ट्रेस लेव्हलही कमी होते. दुपारी ४ ते ६ यावेळेत काहीतरी पौष्टिक खाण्याचे इतरही काही फायदे आहेत ते कोणते ते पाहा.. 

 

दुपारी ४ ते ६ यावेळेत काहीतरी पौष्टिक खाण्याचे फायदे

१. थकवा, दिवसभराचा ताण कमी होतो.

कपाट, घर आवरताना जुन्या, खराब वस्तू टाकूनच द्याव्या वाटत नाही? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो

२. ऑफिसचे तास संपवून संध्याकाळी घरी गेल्यानंतर थकवा येत नाही. उलट फ्रेश आणि उत्साही वाटते.

३. सायंकाळी खाणे झालेले असल्याने रात्री खूप जास्त जेवण जात नाही. त्यामुळे रात्री शांत आणि लवकर झोप लागते. दुसऱ्यादिवशी वेळेत जाग येते आणि अंग जड झाल्यासारखे होत नाही. 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनामहिला