Join us  

रामदेव बाबा सांगतात, वेट लॉसचा अचूक फॉर्म्युला, फॉलो करा फक्त ४ रुल्स; वजन घटणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 10:57 AM

How To Reduce Weight, Explains Baba Ramdev : कधी जेवायचं, सकाळची सुरुवात कशाने करायची? रामदेव बाबांचा रूल फॉलो करा-राहाल कायम फिट..

जिममध्ये तासंतास घाम गाळूनही बऱ्याचदा वजन घटत नाही. अशावेळी कष्ट घेऊनही वजन कमी होत नाही, तेव्हा वजन कमी करण्याची इच्छा तर कमी होतेच, शिवाय हिरमोडही होतो. वजन वाढले की फक्त शरीर बेढप दिसत नसून, यासोबत मधुमेह, कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक यासह इन्फर्टिलिटीची समस्या मागे लागते (Weight Loss). वजन कमी करणे तसे सोपे नाही, शिवाय झटक्यात रीजल्ट दिसेल असेही नाही.

जिम, योगा, डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नसेल तर, योगगुरु रामदेव बाबा यांनी सांगितलेल्या काही आयुर्वेदिक उपाय करून पाहा (Ramdev Baba). या उपायांमुळे वजन नक्कीच घटेल. शिवाय इतर आजारही दूर राहतील(How To Reduce Weight, Explains Baba Ramdev).

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

दालचिनीचा चहा

बाबा रामदेव यांच्या मते, जर आपण नियमितपणे दालचिनीचा चहा प्यायल्यात तर नक्कीच वजन घटेल. यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वजन घटवण्यास मदत करतात. यासाठी उकळत्या पाण्यात दालचिनी घाला. आपण त्यात मध देखील घालू शकता. पाणी कोमट झाल्यानंतर रिकाम्या पोटी प्या. यामुळे आरोग्याला फायदाच होईल.

कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..

लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. बाबा रामदेव यांच्या मते, सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होते. यासह शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

सॅलड

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नियमित सॅलड खावे. जर जेवणाआधी सॅलड खात असाल तर, याचा फायदा आरोग्याला होऊ शकतो. ज्यामुळे आपण अति खाण्याच्या सवयीपासूनही दूर राहतो. जितकी भूक आहे, तितकेच जेवतो. शिवाय शरीरात अतिरिक्त कॅलरीजही वाढत नाही.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

चपाती-भात टाळा

रामदेव बाबा यांनी रात्रीच्या वेळेस चपाती-भात न खाण्याचा सल्ला दिला आहे. रात्रीच्या वेळेस चपाती-भात अतिप्रमाणात खाल्ल्याने चयापचय क्रिया मंदावते. शिवाय शरीरात चरबी वाढू लागते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

सातच्या आत डिनर

रात्रीचे जेवण उशिरा केल्याने शरीरातील चरबी लवकर घटत नाही. जेवल्यानंतर अनेक जण झोपतात. शरीराची हालचाल होत नसल्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. यासह रक्तातील साखरेची पातळीही वाढू लागते. त्यामुळे रामदेव बाबांनी सातच्या आधी रात्रीचं जेवण करण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स