Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

Health And Beauty Tips by  Rujuta Divekar: त्वचा- केस म्हणजेच सौंदर्य आणि आरोग्य हे जर योग्य पद्धतीने राखता आलं, तर आणखी काय हवं.. हिवाळ्यात (winter season) याच महत्त्वाच्या गोष्टींची कशी काळजी घ्यायची, याविषयी सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 03:29 PM2022-12-30T15:29:25+5:302022-12-30T15:30:59+5:30

Health And Beauty Tips by  Rujuta Divekar: त्वचा- केस म्हणजेच सौंदर्य आणि आरोग्य हे जर योग्य पद्धतीने राखता आलं, तर आणखी काय हवं.. हिवाळ्यात (winter season) याच महत्त्वाच्या गोष्टींची कशी काळजी घ्यायची, याविषयी सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर.

How to take care of health, skin and hair problems specially in winter season? Special suggestion given by Rujuta Divekar | त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

Highlightsजे आपल्या खाद्य संस्कृतीनुसार आहे, जे आपल्याकडचं स्थानिक आहे आणि फार पुर्वीपासून चालत आलेलं आहे, अशा गोष्टींचा किंवा पदार्थांचा वापर आहारासाठी किंवा सौंदर्यासाठी कसा करून घ्यायचा, यावर ऋजुता यांचा नेहमीच भर असतो.

हिवाळा सुरू झाला की सगळ्यात आधी आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात. सर्दी- खोकला, कफ असे संसर्गजन्य आजार घरोघरी पसरतात. शिवाय थंडीचा कडाका वाढू लागला की अंग कोरडं पडणं, केसांतला कोंडा वाढून केस गळणं, डोक्यात खाज सुटणं असा त्रासही होतो. एकंदरीतच आरोग्याची आणि सौंदर्याची (How to take care of health, skin and hair problems) या दिवसांत जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. म्हणूनच प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ यांनी हिवाळ्यात (winter season) सौंदर्य आणि आरोग्य यांची कशी काळजी घ्यावी, याविषयीची एक खास पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (Health And Beauty Tips by  Rujuta Divekar)

जे आपल्या खाद्य संस्कृतीनुसार आहे, जे आपल्याकडचं स्थानिक आहे आणि फार पुर्वीपासून चालत आलेलं आहे, अशा गोष्टींचा किंवा पदार्थांचा वापर आहारासाठी किंवा सौंदर्यासाठी कसा करून घ्यायचा, यावर ऋजुता यांचा नेहमीच भर असतो. त्यामुळे त्यांनी सुचविलेले उपायही सर्वसामान्यांना करायला अगदी सोपे असतात. आता सध्या त्यांनी जो उपाय सुचविला आहे, तो देखील अशाच पद्धतीचा आहे. 

 

हिवाळ्यात कशी घ्यायची केसांची- त्वचेची काळजी
१. यातला पहिला मुद्दा सांगताना ऋजुता यांनी या हंगामात मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्यावर भर दिला आहे.

सर्दी- पडसं होऊन नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय

त्यामुळे सगळ्यात आधी हिवाळ्यात आपल्या स्थानिक बाजारात मिळणाऱ्या सगळ्या हिरव्या भाज्या, फळे आपल्या आहारात येतात की नाही, हे एकदा तपासून पहा आणि नसतील येत तर लवकर सुरू करा.

 

२. दुसरा उपाय म्हणजे हिवाळा सुरू झाला की घरोघरी डिंक, उडीद, मेथ्या, सुकामेवा घालून लाडू केले जातात.

सलग दोनदा ICC क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळविणारी स्मृती मानधना! बघा तिची उत्तुंग भरारी

हे लाडू देखील नियमितपणे खा. कारण यातील पदार्थ तुमच्या सौंदर्यासाठी तसेच थंडीत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींसाठी लाभदायक ठरतात. 

 

३. तिसरा उपाय म्हणजे आवळ्याचं सरबत किंवा च्यवनप्राश. या दिवसांत आवळे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यात व्हिटॅमिन सी सोबतच इतरही अनेक महत्त्वाची खनिजे असतात. 

 

नव्या वर्षात बिंधास्त जगायचं, टेंशनला ठोकायचाय रामराम? मग २०२२ सोबत ५ सवयींनाही म्हणा बाय-बाय

४. चौथा उपाय म्हणजे मोहरीचं तेल. मोहरीच्या तेलामध्ये मेथीदाणे भिजत घाला आणि या तेलाने डोक्याला मालिश करा. या तेलाने अंगाला मालिश केली तरी चालते. यामुळे केस आणि त्वचा दोन्हीही उत्तम राहण्यास मदत होईल.   


 

Web Title: How to take care of health, skin and hair problems specially in winter season? Special suggestion given by Rujuta Divekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.