Join us  

पोटावर टायर-कंबर जाड, फिगर बिघडली? किचनमधला 'हा' पदार्थ रोज खा, घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 4:48 PM

How To Use Ajwain for weight Loss :सुटलेलं पोट लवकर कमी होत नाही, हा उपाय मात्र करुन पाहा

सध्या वजन वाढण्याची (Weight Loss Tips) समस्या खूपच कॉमन झाली आहे. अनहेल्दी लाईफस्टाईल आणि फिजिकल एक्टिव्हीटीच्या कमतरेमुळे वेगानं वजन वाढू  लागते. जेव्हा वजन कमी करण्याची गोष्ट येते तेव्हा आयुर्वेदात अनेक पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामुळे वजन कंट्रोल करण्यास मदत होते. किचनमध्ये ठेवले जाणारे मसाले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. (How To Use Ajwain for weight Loss) 

ओव्याचा नियमित वापर केल्यानं वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि इतर आरोग्यदायी फायदेही मिळतात. (Ref)ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं तुम्ही ओव्याचा वापर करू शकता.  रिसर्चनुसार ओवा आणि जीऱ्याचं एकत्र सेवन केल्याने वजन होण्यासही मदत होते.

वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने करा ओव्याचे सेवन

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की  ओव्यात पोषणासंबंधित अनेक गुण असतात. खासकरून यात  थायमोल असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते याशिवाय मेटाबॉलिझ्म वाढतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते. याशिवाय ओव्यात भरपूर फायबर्स असतात ज्यामुळे  वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

ओवा आणि तुळशीचं पाणी

ओवा आणि तुळशीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते. यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नसते. एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या. या १ चमचा ओवा घ्या आणि त्यात थोडी तुळशीची पानं घाला. त्यानंतर हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. थंड करून कोमट झाल्यानंतर प्या. ज्यामुळे पोटात गॅस होणं, अपचन, गॅस यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

ओवा आणि लिंबू पाणी

सकाळच्यावेळी अर्धा चमचा ओवा एक  ग्लस पाण्यात मिसळून एका भांड्यामध्ये ठेवून उकळवून घ्या. यात थोडा लिंबाचा रस घालून प्या. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढेल आणि  याच्या नियमित सेवनाने वाढलेलं वजन कमी होण्यासही मदत होईल.

माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

ओव्याचा चहा

एक कप पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून उकळवून  घ्या. उकळवून झाल्यानंतर गॅसवरून घाली घेऊन त्यात अर्धा चमचा मध मिसळा. हे पाणी प्यायल्याने भरपूर फायदे मिळतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स