Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

How to Use Chia Seeds For Weight Loss : रोजच्या आहारात तुम्ही चिया सिड्सचा समावेश करू शकता. चिया सिड्सचे तब्येतीला बरेच फायदे असतता. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:16 AM2024-01-08T08:16:16+5:302024-01-08T13:45:08+5:30

How to Use Chia Seeds For Weight Loss : रोजच्या आहारात तुम्ही चिया सिड्सचा समावेश करू शकता. चिया सिड्सचे तब्येतीला बरेच फायदे असतता. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

How to Use Chia Seeds For Weight Loss : How to Lose Weight Using Chia Seeds | पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

पोट फार सुटलंय-कंबरेचे टायर्स दिसतात? १ चमचा 'या' बीया खा; पोट सपाट होईल-स्लिम दिसाल

हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांचे वजन वाढू लागते. कारण बरेचजण या सिजनमध्ये तेलकट पदार्थ खाणं पसंत करतात. जर तुम्हीही फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचे शौकीन असाल आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर  आपलं डाएट बॅलेंस करायला हवं. (Weight Loss Food) आहारातून अन्हेल्दी पदार्थ दूर करून तुम्ही काही प्रमाणात हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता. (How to Consume Chia Seeds For Weight Loss) रोजच्या आहारात तुम्ही चिया सिड्सचा समावेश करू शकता. चिया सिड्सचे तब्येतीला बरेच फायदे असतता. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. (How to Lose Weight)

चिया सिड्समध्ये फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅन्गनीज, ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स यांसारखी तत्व असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात. चिया सिड्सना 'सुपरफूड' असेही म्हणतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स, फॉस्फरस, तांबे आणि लोह  असते.

एव्हरी डे हेल्थच्या रिपोर्टनुसार जर्नल ऑफ फंक्शन फूड्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात दिसून आले की चिया सिड्समध्ये एटी ऑक्सिडेंट्स असतात. जे हृदय आणि यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. संशोधकांना असे दिसून आले की हा फायबर्सचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे पचनास मदत होते आणि डायबिटीस, नैराश्या यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

१) लठ्ठपणा कमी करण्यासाठी चिया सिड्सस फायदेशीर ठरतात. सॅलेडमध्ये सिया सिड्सचा समावेश केल्यास तब्येत चांगली राहते आणि मेटाबॉलिझ्मही वाढतो.

सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा गव्हाच्या पीठाचा खास उपाय करा, लांब-दाट होतील केस

२)  चिया सिड्स तुम्ही सॅलेडमध्येही खाऊ शकता. चवीला फार आवडत नसतील तर तुम्ही सॅलेडमध्ये याचा समावेश करू शकता किंवा सकाळी उठल्यानंतर चिया सिड्सचे पाणी पिऊ शकता. 

३) हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. वजन कमी करण्यासााठी तुम्ही डाएटमध्ये सूपचा समावेश करू शकता.  यात एक ट्विस्ट आहे. सूपमध्ये तुम्ही चिया सिड्सचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील.

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

४) जर तुम्ही रोज चिया सिड्सचे सेवन केले तर डायजेशन चांगले राहील. कारण यात हेल्दी फायबर्स असतात. हे खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. याशिवाय डायजेटिव्ह सिस्टीमही चांगली राहते. वजनही वाढत नाही. उलट्या, अपचन यांसारखे त्रास उद्भवत नाहीत.

५) जखम झाल्यानंतर भरपूर रक्त वाहते अशावेळी ब्लड क्लोटींगची समस्या टाळण्यासाठी तुम्ही चिया सिड्सचे सेवन करू शकता. यातील ओमेगा-३ फॅटी एसिड्स रक्त पातळ होण्याची प्रक्रिया सुरळीत होते.

Web Title: How to Use Chia Seeds For Weight Loss : How to Lose Weight Using Chia Seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.