Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार

चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार

How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats : 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या ७ प्रकारे जिरे खा! वाढलेलं पोट आणि वजनात दिसेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 07:26 PM2024-11-06T19:26:52+5:302024-11-06T19:41:25+5:30

How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats : 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या ७ प्रकारे जिरे खा! वाढलेलं पोट आणि वजनात दिसेल फरक...

How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss | चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार

चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार

वाढते वजन आणि पोटाची ढेरी ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे. वाढलेलं वजन आणि पोटाची लटकणारी ढेरी तुमचे सौंदर्य तर बिघडवतेच सोबतच आरोग्यासाठी देखील हानिकारक असते. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. वाढलेलं वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वजन कमी करण्यासाठी आपण डाएट व एक्सरसाइज करतो, पण यासोबतच अनेक घरगुती उपाय देखील करून पाहतो(How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats).

या घरगुती उपायांमध्ये, वजन कमी करण्यासाठी काहीजण लिंबू, मधाचे पाणी घेतात तर काहीजण मेथीदाणे खातात. यासोबतच कुणी दालचिनी, लवंगाचे पाणी पितात, तर कुणी चिया सीड्स खाणे पसंत करतात. यासारखाच अजून एक उपाय म्हणजे वजन आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी रोजच्या डाएट आणि एक्सरसाइज सोबत डेली रुटीनमध्ये जिऱ्याचा समावेश करणे. वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी जिरे कोणत्या पद्धतीने खावेत ते पाहूयात(7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss).

वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी जिरे कोणत्या प्रकारे खावेत ? 

१. सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे :- सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते, यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे घालून ते रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते उकळून, गाळून रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे वजन आणि पोटाची ढेरी कमी होण्यास मदत मिळते. 

२. लिंबू - जिरे पाणी :- लिंबू पाण्यांत जिरे मिसळून प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे पोटात साचून राहिलेले अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत होते. त्यामुळे एक ग्लास कोमट जिऱ्याच्या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्या.

वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर...

३. आले जिरे पाणी :- आले आणि जिरे यांचे एकत्रित पाणी प्यायल्याने आपले पचन सुधारते, चयापचय क्रियेचा वेग वाढतो, आणि भूक नियंत्रित होते. जे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रोज जिरे आणि आले पाण्यात उकळून जेवणाआधी प्यावे.

४. दह्यासोबत जिरे :- रोजच्या जेवणात दह्यामध्ये भाजलेली जिरेपूड मिसळून खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे पचन देखील सुधारते आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या जेवणात आवर्जून दह्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसळून असे दही खाणे वजन कमी  करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

५. जिरे बडीशेप पाणी :- बडीशेप आणि जिऱ्याचे एकत्रित पाणी प्यायल्यास पोटातील गॅस-ॲसिडिटीपासून आराम मिळतो. एवढेच नव्हे तर पोटाला थंडावा देखील मिळतो. यासोबतच, बडीशेप- जिऱ्यामध्ये असलेले पौष्टिक गुणधर्म पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप पाण्यात उकळून हे पाणी प्यावे. 

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

६. जिरे आणि दालचिनी :- चिमूटभर दालचिनी पावडर आणि जिरेपूड गरम पाण्यात मिसळून हे पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटावरील चरबीही कमी होते. 

७. डिटॉक्स ड्रिंक म्हणून :- पाण्यात जिरे, पुदिना, काकडी आणि लिंबाचे काप मिसळा आणि हे पाणी दिवसभर प्या. हे पाणी आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटावरील चरबी देखील कमी होते.

Web Title: How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.