Join us  

वजन वाढण्याचं टेन्शन? 'या' पद्धतीने खा धणे, बघा चमच्याभर धण्यांची कमाल, वजन राहते आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 1:04 PM

Use of Coriander Seeds For Weight Loss: वजन वाढण्याची सतत चिंता करत असाल तर ती चिंता आता सोडा... कारण धणे जर योग्य पद्धतीने खाल्ले तर तुमचं वजन नेहमीच आटोक्यात राहील. (Home remedies for improving digestion and metabolism)

ठळक मुद्देस्वयंपाकात धणे किंवा धणेपूड आपण नेहमीच वापरतो. पण आता त्याच धण्यांचा वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने योग्य वापर करायचा ते पाहुया...

काही लोकांना सतत वजन वाढण्याचं टेन्शन असतं. काहीही खाल्लं तरी त्यांचं लक्ष वजनाचा काटा किती वर जाणार याच्याकडे लागलेलं असतं. असं सतत वजन वाढीचं टेन्शन घेणं सोडा आणि हा सोपा घरगुती उपाय करा. हा उपाय केल्याने तुमचं वजन वाढणार नाही. जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठीही हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. आपल्या स्वयंपाकात धणे किंवा धणेपूड आपण नेहमीच वापरतो. पण आता त्याच धण्यांचा वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने योग्य वापर करायचा ते पाहुया....(How to use dhane or coriander seeds for weight loss?)

वजन कमी करण्यासाठी धण्यांचा उपयोग

 

आयुर्वेदानुसार पचनक्रिया आणि चयापचय क्रिया यांचे कार्य उत्तम होण्यासाठी धणे अतिशय उपयुक्त असतात (Home remedies for improving digestion and metabolism).

पुन्हा एकदा "हम आपके है कौन"ची 'निशा' बनून आली माधुरी दीक्षित, कारण होतं खास...

या दोन्ही क्रिया चांगल्या झाल्या तर शरीराला भरपूर उर्जा मिळते. धण्यांमध्ये असणारे काही नैसर्गिक घटक भुकेची जाणीव कमी करतात, तसेच त्यात फायबरही भरपूर असतात. त्यामुळे आपोआपच खाण्यावर नियंत्रण येऊन वजन कमी होण्यास फायदा होतो. पण त्यासाठी धण्यांचा मात्र योग्य पद्धतीने वापर करायला हवा. तो कसा करायचा ते पाहूया..

 

१. धण्याचा काढा 

हा काढा तयार करण्यासाठी २ कप पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये १ टेबलस्पून धणे टाका. हे पाणी ६ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या. जेव्हा पाण्याचा रंग बदलेल, तेव्हा गॅस बंद करा.

 

पोह्यांवर लिंबू का पिळावं? बघा शास्त्रीय कारण- कोणते पदार्थ कशासोबत खावे याचे सुपर कॉम्बिनेशन्स...

हे पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर त्यात थोडा मध घालून प्या. हा उपाय केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासही मदत होते.

 

२. धण्याचे पाणी

हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात २ टीस्पून धणे आणि १ टीस्पून जीरे भिजत घाला.

सिंकमधून खूपच कुबट वास येतो, ३ उपाय करा- सिंक स्वच्छ होऊन दुर्गंधी निघून जाईल

सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. हा उपाय केल्याने पचनक्रिया, मेटाबॉलिझम अधिक चांगले झाल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआहार योजना