बडीशेपेचा वापर माऊथ फ्रेशनर प्रमाणे केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का माऊथ फ्रेशनरच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात. (Weight Loss Tips) ज्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते म्हणूनच जेवणानंतर बडिशेपेचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (Funnel Seeds For Weight Loss) बडिशेपेत मोठ्या प्रमाणात फायबर्स, एंटीऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतात. बडीशेपेच्या सेवनाने त्वचा आणि केस चांगले राहण्यासही मदत होते. रोज बडिशेपेचं सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याचे सेवन करू शकता. (According To Research Use Funnel Seeds For Weight Loss)
रिसर्चनुसार बडीशेपेच्या सेवनाने शरीराची चरबी आणि स्नायूंवर सकारात्मक परिणाम होतो. बडिशेप एक हर्बल औषधांपैकी एक आहे. (Ref) जे पारंपारीक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अनेक मसाल्यांमध्ये याचा वापर केला जातो. बडिशेपेचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा आणि पीसीओएसची समस्या दूर होण्यासही मदत होते.
काळे कमी पांढरे केसच जास्त दिसतात? आहारतज्ज्ञ सांगतात जेवणात 'हे' पदार्थ खा; काळेभोर होतील केस
जर तुम्हाला गोड खाण्याची खूपच जास्त क्रेव्हींग होत असेल तर तुम्ही भाजलेल्या बडीशेपेचा आहारात समावेश करू शकता. बडीशेप हलकी भाजून घ्या. त्यात तुम्ही थोड्या फार प्रमाणात खडीसाखर किंवा सैंधव मीठ घालू शकता. ज्यामुळे गोड खाण्याची क्रेव्हिंग कमी होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
बडीशेपेचा चहा कसा करायचा? (How To Make Funnel Seeds Tea)
बडीशेपेच्या चहाचे सेवन केल्याने वजन सहज कमी होण्यास मदत होते. आरोग्यालाही भरपूर फायदे मिळतात. बडिशेपेचा चहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडिशेप घालून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून गाळून घ्या. त्यात तुम्ही थोड्याफार प्रमाणात गूळ घालू शकता. बडिशेपेचा चहा प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.
शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल बाहेर निघेल; किचनमधले २ पदार्थ रोज खा, रामदेव बाबांचा खास सल्ला
बडिशेपेची पावडर (How To Make Funnel Seeds Powder)
तुम्ही बडिशेपेची पावडर बनवून सुद्धा याचे सेवन करू शकता. यासाठी बडिशेप व्यवस्थित दळून पावडर तयार करून घ्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडिशेपेची पावडर घालून याचे सेवन करा. बडिशेपेच्या पावडरचे सेवन केल्याने गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होते.