Join us  

वाढलेले वजन-पोटाची ढेरी कमी करेल आल्याचा इंचभर तुकडा, पाहा ‘हा’ जादूई उपाय-सोपा आणि असरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 4:07 PM

How to use Ginger for weight loss : Ginger for weight loss: How it works and how to consume it : आल्याचा उपयोग करुन आपण वाढलेलं वजन आणि ढेरी दोन्ही झटपट कमी करु शकतो.

बदलती लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, बैठं काम यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना आमंत्रणच दिल जात. यात वजन वाढीची समस्या अनेकांना सतावते. वाढलेली वजन आणि पुढे आलेली पोटाची ढेरी कुणालाही आवडत नाही. काहीवेळा वाढत्या वजनामुळे आपल्या पोटाचा आकार वाढून ढेरी पुढे यायला लागते. अचानक पुढे आलेली ढेरी दिसायला लागते तेव्हा आपल्याला नकोसे वाटते. पुढे आलेल्या ढेरीमुळे आपली पर्सनॅलिटी तर खराब दिसतेच, सोबत आपला बॉडी शेप देखील बिघडतो. अशावेळी वजन कमी करण्यासाठी जिमिंग सोबतच काहीजण घरगुती उपाय करण्यावर जास्त भर देतात(How to use Ginger for weight loss).

वाढलेले वजन व ढेरी कमी करण्यासाठी अनेकजण डिटॉक्स वॉटर पितात. याचबरोबर काहीजण मेथी दाणे, जिरे, ओवा, अशा वेगवेगळ्या बिया रात्रभर भिजत ठेवून सकाळी त्याचे पाणी पिणे पसंत करतात. अकाली वाढलेल वजन आणि पोट यांना कमी करण्यासाठी रोजच्या वापरातलं आलं फायदेशीर ठरत. आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये आलं हे कायम असतंच. सर्दी - खोकला झाला असता आपण आल्याचा गरमागरम चहा पितो. याच आल्याचा उपयोग करुन आपण वाढलेलं वजन आणि ढेरी दोन्ही झटपट कमी करु शकतो. वाढलेलं वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी आल्याचा वापर कसा करावा ते पाहूयात(Ginger for weight loss: How it works and how to consume it) वाढलेलं वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी असा करा आल्याचा वापर... 

१. आल्याचा चहा :- सतत वाढत जाणारे वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी आपण आल्याचा चहा पिऊ शकतो. हा आल्याचा चहा बनवण्यासाठी कपभर गरम उकळते पाणी घेऊन त्यात छोटासा आल्याचा तुकडा किसून घालावा. त्यानंतर हे पाणी गॅसच्या मंद आचेवर जोपर्यंत उकळवून अर्धे होत नाही, तोपर्यंत चांगले उकळवून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करुन हा आल्याचा चहा गाळणीने गाळून गरमागरम आल्याचा चहा प्यावा. आल्यामध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात. अशाप्रकारे आल्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. या चहामध्ये तुम्ही मधही घालू शकता. पण, जर तुम्ही त्यात मध घालणार  असाल तर चहा रुम टेम्परेचरला आल्यानंतरच त्यात मध घाला. या चहामुळे तुमचे वजन आणि पोटावरची चरबीही कमी होण्यास मदत मिळेल. 

ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त... 

२. आल्याचे डिटॉक्स ड्रिंक :- वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी आल्यापासून बनवलेले डिटॉक्स ड्रिंक देखील पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी आले पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस घालून सकाळी उपाशी पोटी प्यावे. त्यामुळे वजन लवकर कमी होईल आणि पचनक्रियाही सुधारेल. या पेयामुळे शरीरात साचलेले टॉक्सिन्सही बाहेर निघून जाण्यास मदत होईल. 

३. आल्याचा काढा :- वजन कमी करण्यासाठी तुम्ही आले, दालचिनी आणि काळीमिरी असे सगळे जिन्नस एकत्रित मिसळून आल्याचा काढा बनवू शकता. यासाठी तुम्हाला १ तुकडा दालचिनी, १ तुकडा आले आणि ५ ते ६ काळीमिरी लागतील हे सगळे जिन्नस पाण्यात घाला, आणि हे पाणी उकळा आणि ते पाणी व्यवस्थित उकळून अर्धे झाले की गाळून प्यावे. हा काढा प्यायल्याने तुमचे वजन सहजपणे कमी होईल. शक्यतो रात्री  झोपण्यापूर्वी हा काढा प्यावा. आपल्याला काहीच दिवसांत वजनात फरक जाणवू लागेल.

तुळशीची ४ पाने तुमचं वजन कमी करु शकतात! ‘हा’ खास उपाय करा- वजन घटवा चकटफू...

अशाप्रकारे वजन कमी करण्यासाठी तुम्ही या तीन प्रकारे आल्याचा वापर करु शकता. आल्याचा चहा, आल्याचे डिटॉक्स ड्रिंक, आल्याचा काढा या तीन पद्धतींनी आपण वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर करु शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स