सध्याच्या धावपळीच्या जगण्यात आपण स्वत:च्या डाएटकडे फारसं लक्ष देऊ शकत नाही. ज्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासते. (Guava Leaf Tea for Weight Loss) थंडीच्या दिवसात फळं खाल्ल्याने तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. या फळांचे सेवन तब्येतीसाठी आवश्यक मानले जाते. हिवाळ्यात पेरू भरपूर खाल्ले जातात. पेरू प्रमाणेच पेरूची पानंही तब्येतीसाठी तितकीच फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांमुळे आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. (How to Prepare Guava Leaves For Weight Loss) जेवणापूर्वी ही पानं चावून खाल्ल्यास वजन कंट्रोलमध्ये राहू शकते.
पेरूच्या पानांमुळे वजन कंट्रोलमध्ये राहते (How Guava Leaves Beneficial for Weight Loss)
बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार पेरूची पानं कॅलरी फ्री असतात. ज्यामुळे वजन कमी करणं सहज सोपं होतं. कारण याचे सेवन केल्याने बराचवेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेलं राहतं. पेरूच्या पानांचा ज्यूसही बनवून शशकता किंवा ही पानं हलकी उकळून याचे सेवन करू शकता. यात फायबर्स जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय डायबिटीस कंट्रोल होण्यासही मदत होते.
पोट सुटलंय, व्यायामासाठी वेळ नाही? रात्री १० नंतर गरम पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, झरझर घटेल वजन
पेरूच्या पानांत अनेक औषधी गुणधर्म (Guava Leaves Properties)
पेरूच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पेरू आणि पेरूच्या झाडात एंटीडायबिटीक, एंटी मायक्रोबियल, एंटी डायरियल आणि एंटीफंगल गुण असतात. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायलन इन्फेक्शन, मलेरिया, श्वसनाचे संक्रमण, तोंडाचे संक्रमण, त्वचेचं संक्रमण, डायबिटीस, हृदयविकार आणि कुपोषणाशी संबंधित समस्या टाळता येतात. हेल्दीफाय मी च्या रिपोर्टनुसार पेरुतून व्हिटामीन सी सुद्धा मिळते.
पेरूच्या पानांच्या सेवनानाबाबत तज्ज्ञ काय सांगतात...(Ayurveda Expert says About Guava Leaves)
आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भावसार यांच्यामते पेरूची पानं थंड असतात आणि चवीला थोडी आंबट-गोड असता. पेरूत फायबर,व्हिटामीन ए,सी आणि फॉलिक एसिड, मँगनीज असते याशिवाय यात कॅरोटेनॉइड्स, पॉलिफेनोल्स असते. यात एंटी एजिंग आणि एंटी कॅन्सर गुण असतात त्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते.
रोज गळून केस शेपटीसारखे बारीक झाले? राईच्या तेलात हा पदार्थ घालून लावा; घनदाट होतील केस
डायबिटीस कंट्रोल राहण्यास मदत होते (Guava Leaves For Diabetes Control)
डायबिटीस असल्यास पेरूच्या पानाचे सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते. या पानांतील अर्क एंटी हायपरग्लिसमिक गुण असतात. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
पेरूच्या पानांचे सेवन कसे करावे? (Best Way to Use Guava Leaves)
पेरूची पानं स्वच्छ धुवून अशीच खाता येतात पण तुम्हाला असंच खायचं नसेल तर तुम्ही या पानांचा चहा करू शकता. पेरूच्या पानांचा चहा सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोट घेऊ शकता जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त परिणाम शरीरावर दिसून येईल. पेरूची ५ ते ६ पानं धुवून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन १० मिनिटं व्यवस्थित उकळून घ्या. तुम्ही यात आवडीनुसार गूळ घालू शकता. नंतर गाळून या चहाचे सेवन करा.