Join us  

तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल! बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 11:25 AM

How To Use Rice Water For Weight Loss: तांदळाचं पाणी फक्त त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठीच नाही तर वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतं.. (tandalachi pej karnyachi recipe in marathi)

ठळक मुद्देत्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसदेखील भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.

तांदळाचं पाणी सध्या सौंदर्य क्षेत्रात खूप गाजत आहे. तांदळाच्या पाण्याचा उपयोग त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी होतो, हे आपल्याला माहिती आहे. कोरियन महिलांची, तरुणींची त्वचा एवढी सुंदर, तरुण आणि नितळ दिसते त्याचं कारणही तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर हेच आहे. आपल्यापैकी अनेक जण सौंदर्यासाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग तर करतातच. आता वजन कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी पिऊन पाहा. सौंदर्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी तयार करण्याच्या पद्धती पुर्णपणे वेगवेगळ्या आहेत (how to make rice water for drinking). खाण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी जे तांदळाचं पाणी तयार केलं जातं, त्याला अनेक ठिकाणी भाताची पेज असंही म्हणतात (how to use rice water for weight loss). ही भाताची पेज आता वेटलॉससाठी कशी उपयुक्त ठरते ते पाहूया...(tandalachi pej karnyachi recipe)

 

वजन कमी करण्यासाठी भाताची पेज किंवा तांदळाच्या पाण्याचा उपयोग

तांदळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा भात शिजत असतो तेव्हा व्हिटॅमिन बी २, बी ६, बी ९, बी १ हे घटक पाण्यात मिसळले जातात. ते मेटाबॉलिझमसाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

तसेच त्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसदेखील भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच आपल्याकडे आजारी व्यक्तीला भाताची पेज देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या पाण्यात कॅलरी खूप कमी असतात आणि इतर पौष्टिक घटक खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी या पाण्याचा खूप उपयोग होतो, असं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.  

 

भाताची पेज कशी तयार करायची?

भाताची पेज तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. ही पेज करण्यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. पण आसट, चिकट भात होणारा तांदूळ वापरल्यास अधिक चांगले.

भरपूर प्रोटीन्स देणारे मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्यासाठी- मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट मेन्यू- बघा सोपी रेसिपी 

आता धुवून घेतलेल्या पाण्यात दुप्पट किंवा अडीचपट पाणी टाका आणि तो पातेल्यात गॅसवर शिजवायला ठेवा. भात ९५ टक्के शिजल्यावर जे पाणी पातेल्यात वरवर राहिलेलं असेल ते पाणी अलगद काढून घ्या. यालाच भाताची पेज म्हणतात.

थोडंसं तूप घालून तुम्ही ते पिऊ शकता. किंवा तूप, जिरेपूड, २ ते ३ थेंब लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घालून प्यायल्यास चव आणखी छान लागते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.