कोरोनाची माहामारी आणि लॉकडाऊन नंतर वजन वाढण्याची समस्या खूपच वाढली आहे. काहीजण तासनतास जीममध्ये घाम गाळतात तर काहीजण डायटिशियन कडून महागडे डाएट प्लॅन घेतात. वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या बीया म्हणजे सब्जासुद्धा फायदेशीर ठरू शकते. (Sabja Seeds Benefits for Weight Loss)
वजन कमी करण्याासठी सगळ्यात आधी सब्जाच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी भिजवल्यानंतर सकाळी हे पाणी प्या. (Weight Loss Tips) लठ्ठपणा आणि वाढतं वजन हे गंभीर समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणामुळे फक्त आत्मविश्वासच कमी होत नाही तर गंभीर आजारही उद्भवू शकतात. (How To Use Sabja Seeds For Weight Loss)
सब्जाच्या बीया थेट आहारात समाविष्ट केल्या जाऊ शकत नाही. म्हणून १ ते २ चमच्या बीया १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सब्जाच्या बिया पाण्यात २ ते ३ तासांसाठी भिजवून ठेवा. डायटिशियन्सच्यामते सब्जाच्या बीया पाण्यात भिजवल्या जातात. तेव्हा त्याचा आकार वाढतो यावेळी त्यातील फायबर्सही वाढतात आणि डायजेस्टिव्ह एंजाइम्स वाढतात. एक्सपर्ट्सच्या मते वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन करायला हवं.
पाण्यात भिजवण्याव्यतिरिक्त, तुम्ही स्मूदीमध्ये, शेकमध्ये आणि कॉर्न फ्लेक्ससह सब्जा बिया देखील खाऊ शकता. सब्जा बियांचे सेवन करताना लक्षात घ्या की त्याचा काही लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सब्जाच्या बियांचे अनेक वेळा सेवन केल्याने चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज येणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ सांगतात की, सब्जा बिया खाल्ल्यानंतर ज्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतील त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
चिया सिड्स
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचाही समावेश करू शकता. चिया सिड्स या सब्जाच्या बियांप्रमाणेच असतात पण हा पदार्थ पूर्णपणे वेगळा आहे. या बीया पाण्यात मिसळूनही प्यायल्या जाऊ शकतात. यासाठी काही चिया सिड्स एका ग्लास पाण्यात भिजवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. चिया सिड्स किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा म्हणजे त्याची सुसंगतता योग्य होईल.
जर तुम्हाला चिया सीड्सचे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही ते स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. बर्याच लोकांना पॅनकेक्स आणि पुडिंगमध्ये चिया सिड्स घालून खायलाही आवडते. दुधात चिया सिड्स मिसळून पेय बनवता येते. याशिवाय चिया सिड्स दह्यासोबत खायलाही उत्तम असतात. सफरचंद, केळी किंवा आंबा यांसारखी फळे कापून त्यात चिया सिड्स टाकून खाऊ शकता. हे उत्तम टॉपिंग म्हणून काम करते.