हळद (Turmeric) आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते हे सर्वांनाच माहिती आहे. हळदीमुळे फक्त पदार्थाला रंगच येत नाही तर चवसुद्धा वाढते. हळद औषधी गुणांनी परीपूर्ण असते हळदीच्या सेवनानं गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. याच कारणामुळे अनेक औषधांमध्ये हळदीचा वापर केला जातो. (How To Use Turmeric To Reduce Belly Fat)
आयुर्वेदात हळदीला एक पॉवरफूल जडीबुडी म्हटलं गेलं आहे. हळदीत करक्यूमिन नावाचे नॅच्युरल कंम्पाऊंड असते. ज्यात एंटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. यामुळे शरीरातील इंफेक्शन किंवा क्रोनिक इंफ्लामेशन कमी होण्यास मदत होते. (Know 5 Health Benefits Of Consuming Haldi)
नॅशनल लायब्ररी ऑफि मेडिसिनच्या रिपोर्टनुसार करक्यूमिनच्या सेवनानं वजन कमी होण्यास मदत होते. करक्यूमिनमध्ये नॅच्युरल बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे करक्यूमिननं लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. हळद इम्यूनिटी वाढवण्याचे काम करते (Ref) ज्यामुळे शरीराला आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यातील एंटीसेप्टीक गुणांमुळे जखम लवकर बरी होते. रोज फक्त १ चुटकी हळदीचे सेवन केल्यानं आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. शरीरही निरोगी दिसते.
केस खूप तुटतात-पातळ झालेत? १ चमचा मेथी दाण्यांचा असा वापर करा, घनदाट-लांब केस मिळवा
पोटासाठी हळद फायदेशीर
ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात त्यांच्यासाठी हळदीचे सेवन लाभदायक ठरते. यातील करक्यूमिन हायजेस्टिव्ह एंजाईम्सचे उत्पादनं स्टिमुलेट करते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. हळद गॅस्ट्रिक ज्युसेसच्या उत्पादनाला चालना देते ज्यामुळे पोटात जळजळ होण्याची समस्या उद्भवत नाही.
जर तुम्ही जड शरीराने त्रासलेले असाल आणि तुमचं पोटसुद्धा बाहेर आलं असेल तर हळदीचे सेवन फायद्याचं ठरेल. करक्यूमिनमध्ये एंटीऑक्सिडेंट्स गुण असतात रोज २ ग्लास पाण्यात १ चुटकीभर हळद घालून प्यायल्यानं वजन सहज कमी होते आणि बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
शरीरातील हाडांना एकदम पोकळ बनवते व्हिटामीन B-12 ची कमी; 5 लक्षणं दिसताच सावध व्हाकच्च्या हळदीचे सेवन केल्यानं जुनाट आजार, वेदनांपासूनही आराम मिळतो. यातील इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी, अर्थरायटीस, मांसपेशींच्या वेदनांपासून आराम मिळतो. हळदीत एंटी कॅन्सर गुण असतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. काही संशोधनांनुसार करक्यूमिन कॅन्सर रोखण्यास आणि त्यावर उपचार करण्यात परिणामकारक ठरतात.
करक्यूमिन किमोथेरेपीमुळे अधिक प्रभावी बनता येते. हळदीच्या आपल्या आहारात समावेश करण्याआधी हळदीच्या सेवनाची योग्य पद्धत समजून घ्यायला हवी. हळदीत कॅल्शियम ऑक्सलेटची प्रमाण जास्त असते. याचे काही साईड इफेक्टसही असतात ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.