पायी चालल्याने फक्त शरीराला फिटनेसच्या दृष्टीने फायदे होत नाहीत तर गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. (Health Tips) पायी चालणं एक एरोबिक व्यायामाप्रमाणे आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एण्ड प्रिवेंशनच्या रिपोर्टनुसार रोज कमीत ८ ते १० हजार पाऊलं चालल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (Weight Loss Tips) रोज पायी चालल्याने फक्त वजन नियंत्रणात राहत नाही तर कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर हृदयाच्या समस्याही टाळता येतात. (How Many Steps Should Walk A Day To Lose Weight)
पायी चालल्याने मांसपेशी आणि सांधे मजबूत होतात. याव्यतिरिक्त ताण-तणाव आणि चिंताग्रस्तता दूर होऊन मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासही मदत होते. पाय चालल्याने एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. म्हणूनच लोक सकाळी आणि संध्याकाळी न चुकता चालायला जातात. वजन कमी करण्यासाठी पायी चालण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया.(How to Walk Properly With Good Posture And Correct Technique)
काहीजण रोज पायी चालतात तरी त्यांचे वजन का कमी होत नाही?
वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते की कमीत कमी कॅलरीजचे सेवन करा. आठवड्यातून ८ ते १० पाऊलं चाला. पायी चालल्यानंतरही तुमचं वजन कमी होत नसेल याचा अर्थ असा की तुम्ही जास्त कॅलरीज घेत आहात. व्यायाम आणि पायी चालून तुम्ही आरामात वजन कमी करू शकता.
वजन कमी करण्यासाठी सकाळी की संध्याकाळी कधी वॉक करावे?
ओबेसिटी जर्नल प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा साधा, सरळ उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी कधी, कसे चालावे हे माहीत असायला हवे. सकाळी ७ ते ९ या वेळेत व्यायाम करणं उत्तम मानलं जातं. सकाळी चालणं जमत नसेल तर रात्री पायी चाला.
मॉर्निग वॉक किती वाजता करायचे?
सकाळी ६ ते ८ दरम्यान मॉर्निंक वॉक करणं फायदेशीर ठरतं. कारण या वेळेत कोवळं ऊन मिळतं आणि त्यामुळे आजार दूर राहण्यास मदत होते. संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला जमेल त्या वेळेतही तुम्ही वॉक करू शकतात.