अभिनेता हृतिक रोशन हा अतिशय फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. एखाद्या अभिनेत्याचा फिटनेस कसा असायला हवा, हे सगळ्यात आधी हृतिकनेच दाखवून दिलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजही तो त्याच्या फिटनेससाठी तेवढीच मेहनत घेत असतो. पण त्याची बहिणी सुनैना रोशन (Hrithik Roshan’s sister Sunaina Roshan) मात्र काही वर्षांपर्यंत हृतिकच्या अगदी विरुद्ध होती. हृतिक त्याच्या आहाराबाबत, व्यायामाबाबत जेवढा जागरुक होता, तेवढीच सुनैना निष्काळजी होती. त्यामुळे अगदी अलीकडच्या काळापर्यंत ती खूप जाड होती. तिला फॅटी लिव्हरचा त्रासही होता. पण हा त्रास कमी करत तिने कशा पद्धतीने वजन घटवलं (Sunaina Roshan's Amazing Weight Transformation), याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ तिने स्वत:च सोशल मिडियावर शेअर केला आहे.(weight loss tips by Sunaina Roshan)
वजन कमी करण्यासाठी सुनैना रोशनने काय केलं?
सुनैना म्हणते की तिला पिझ्झा, बर्गर असे जंकफूड, प्रोसेस्ड फूड खायला खूप आवडायचं. त्यामुळे इच्छा झाली की दिवस असो किंवा रात्र असो ती ते हमखास खायचीच. त्यामुळे अगदी रोजच तिचं जंकफूड खाणं असायचं.
वर्ष संपेपर्यंत बरंच वजन कमी होईल, घ्या महिनाभराचा खास डाएट प्लॅन, ३० दिवसांत उतरेल वजन
खाण्यापिण्याचं कोणतंच बंधन तिने पाळलं नाही. पण त्याचा आरोग्यावर परिणाम दिसू लागला. सुरुवातीला वजन वाढलं आणि नंतर तिला फॅटी लिव्हरचा खूप त्रास सुरू झाला. त्यामुळे मग तिने तज्ज्ञांच्या सल्ल्याने तिची जीवनशैली पुर्णपणे बदलली आणि जंकफूड सोडून सकस आहार घेण्यावर भर दिला.
सुनैना म्हणते की तिला ते सगळे पदार्थ एवढे आवडायचे की त्या पदार्थांशिवाय एकेक दिवस ढकलणं तिच्यासाठी अवघड होत होतं. पण तरीही निश्चय केला आणि त्या पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहायला शिकले. आज सुनैनाने जो फिटनेस मिळवला आहे, तो खरोखरच अतिशय कौतूकास्पद आहे.
हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल
ती म्हणते की तुमची तब्येत अगदी सुरुवातीपासूनच सांभाळा. 'तेव्हाचं तेव्हा बघू', 'आता काय होतं' असा ॲटीट्यूड ठेवत आजारपणाची वाट बघू नका. तिने दिलेला सल्ला खरोखरच तरुणांसाठी उपयोगी ठरणारा आहे. कारण 'तरुण वय आहे, काय होणार' असा विचार करत करतच आहारावरचं, स्वत:वरचं नियंत्रण सुटत जातं..