Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण सांगतं शाकाहारी अन्नात प्रोटीन नसतं? ICMR सांगते रोज इतके बदाम खा, भरपूर प्रोटीन मिळेल

कोण सांगतं शाकाहारी अन्नात प्रोटीन नसतं? ICMR सांगते रोज इतके बदाम खा, भरपूर प्रोटीन मिळेल

Best Source Of Protein For Vegetarians : बदामात प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात  असतात ज्यामुळे शरीराचा विकास होतो आणि  मांसपेशी मजबूत होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:32 PM2024-10-26T23:32:57+5:302024-10-26T23:37:31+5:30

Best Source Of Protein For Vegetarians : बदामात प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात  असतात ज्यामुळे शरीराचा विकास होतो आणि  मांसपेशी मजबूत होतात.

Icmr suggest Almond Are Best Source Of Protein For Vegetarians | कोण सांगतं शाकाहारी अन्नात प्रोटीन नसतं? ICMR सांगते रोज इतके बदाम खा, भरपूर प्रोटीन मिळेल

कोण सांगतं शाकाहारी अन्नात प्रोटीन नसतं? ICMR सांगते रोज इतके बदाम खा, भरपूर प्रोटीन मिळेल

जर तुम्ही मांसाहार  करत नसाल तर प्रोटीन कसं मिळवायचं याबाबत चिंता करण्याची काही गरज नाही. प्रोटीन मासंपेशी तयार करण्यासाठी गरजेचे असते. आयसीएमआरच्या एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार  प्रोटीन्स शरीरासाठी गरजेचे असतात. तुम्ही बदाम खाऊनही प्रोटीन्स मिळवू शकता.  हा व्हेजिटेरयन प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. खासकरून भारतासारख्या देशात मोठ्या संख्येनं लोक शाकाहारी आहेत. (Icmr suggest Almond Are Best Source Of Protein For Vegetarians)

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार बदाम शाकाहारी  लोकांसाठी उत्तम प्रोटीन सोर्स आहे.  यामुळे प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते. भारतात बदाम हा लोकांच्या डाएटचा एक भाग आहे. बदामात १५ पोषक तत्व असतात. ज्यात व्हिटामीन ई, मॅग्नेशियम आणि जिंक असते.

बदामात प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात  असतात ज्यामुळे शरीराचा विकास होतो आणि  मांसपेशी मजबूत होतात. १०० ग्राम बदामात जवळपास २१ ग्राम प्रोटीन असते. जवळपास १० बदामात २.५ ग्राम प्रोटीन असते. याव्यतिरिक्त बदामात फायबर्स, व्हिटामीन ई, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्व असतात. आयसीएमआरच्या गाईड लाईन्सनुसार नॅच्युरल सोर्स प्रोटीनवर लक्ष द्यायला हवं. बदाम किंवा डाळींचा आहारात समावेश करा. अन्हेल्दी स्नॅकिंगला तुम्ही मूठभर बदामात बदलू शकता. सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही बदामाचे सेवन करू शकता.

बरेच लोक बदाम खाण्याचे नुकसान असल्याच असल्याचं सांगतात, एक्सपर्ट्सच्या मते हे एक मिथक आहे. तुम्ही किती प्रमाणात खाताय ते लक्षात ठेवा. रोज १० ते १२ बदाम खायला हवेत. तुम्ही जीम किंवा वर्कआऊट करत असाल तर ३० बदाम खाऊ शकता. 

Web Title: Icmr suggest Almond Are Best Source Of Protein For Vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.