Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उपवास करताना काही चुकले तर तब्येत बिघडते; लक्षात ठेवा हे 5 नियम

उपवास करताना काही चुकले तर तब्येत बिघडते; लक्षात ठेवा हे 5 नियम

उपवास हा शरीराला फायदा होण्यासाठी करायचा असतो, पण उपवासानं त्रास होणार असेल तर याचाच अर्थ उपवास करताना आरोग्याचा विचार करुन तो केलेला नाही. उपवासाचे पाच नियम महत्त्वाचे. ते कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:02 PM2021-10-09T19:02:07+5:302021-10-09T19:07:15+5:30

उपवास हा शरीराला फायदा होण्यासाठी करायचा असतो, पण उपवासानं त्रास होणार असेल तर याचाच अर्थ उपवास करताना आरोग्याचा विचार करुन तो केलेला नाही. उपवासाचे पाच नियम महत्त्वाचे. ते कोणते?

If something goes wrong while fasting, the health deteriorates; Remember these 5 rules | उपवास करताना काही चुकले तर तब्येत बिघडते; लक्षात ठेवा हे 5 नियम

उपवास करताना काही चुकले तर तब्येत बिघडते; लक्षात ठेवा हे 5 नियम

Highlights नऊ दिवसांचे उपवास असतील तर या काळात फळांसोबतच कुट्टु, शिंगाडा आणि राजगिर्‍याचं पीठ यांचे पदार्थ फायदेशीर ठरतात.उपवासाला जास्त तळलेले पापड, वडे किंवा भाजलेले शेंगदाणे खाल्ले तर उपवास करुन आरोग्याला काहीच फायदा होणार नाही. उपवासाला साखर आणि मीठाचं प्रमाणही सांभाळायला हवं. यासाठी साखर आणि सोडियमच्या नैसर्गिक स्त्रोतांवर भर द्यायला हवा.

उपवास ही एक धार्मिक परंपरा असली तरी खरंतर हा एक नैसर्गिक उपाय आहे. आपल्या पचनव्यवस्थेवर आलेला ताण घालवण्यासाठी एक दिवस हलका आहार घेऊन तिला आराम देणं. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडायला मदत करणं. खरंतर यासाठी उपवास केला जातो. उपवासाला जर कुपथ्यं केली तर मग त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याबाबतीत आरोग्य प्रशिक्षक प्रीती त्यागी म्हणतात की उपवास हा शरीराला फायदा होण्यासाठी करायचा असतो, पण उपवासानं त्रास होणार असेल तर याचाच अर्थ उपवास करताना आरोग्याचा विचार करुन तो केलेला नाही.

उपवासाचा आरोग्यावर चांगला परिणाम होण्यासाठी प्रीती त्यागी काही नियम सांगतात हे नियम फक्त नवरात्रीच्या उपवासालाच नाही तर कोणत्याही उपवासाला फायदेशीर ठरतात. प्रीती त्यागी यांनी सांगितलेले नियम उपवास एक दिवसाचा असो की नऊ दिवसाचा, प्रत्येक उपवासाला लागू पडतात.

 Image: Google

उपवासाचे नियम

1. उपवासाला अनेकजण केवळ फलाहार करायचं ठरवतात. फलाहार म्हणजे फळं, फळांचा रस यासोबतच सुकामेवाही सेवन करणं. पण फलाहार राहातो बाजूला आणि बटाट्यासारखे घटक जास्त खाल्ले जातात. बटाट्याच्या ऐवजी डांगर, काकडी यांचा समावेश उपवासाच्या आहारात करावा. प्रीती त्यागी म्हणतात की फलाहार करताना फळं, फळांचा रस आणि सुकामेवा खावा. पण एक दिवसाच्या उपवासासाठी हा एकदम प्रभावी आहार आहे.पण नऊ दिवसांचे उपवास असतील तर या काळात फळांसोबतच कुट्टु, शिंगाडा आणि राजगिर्‍याचं पीठ यांचे पदार्थ फायदेशीर ठरतात. शास्त्राप्रमाणे उपवासाला जे पदार्थ चालतात ते सर्व आरोग्यासाठी उपयुक्त असतात. फक्त ते प्रमाणात खायला हवेत. कुट्टु आणि शिंगाड्याचं पीठ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या पिठाचे अनेक पदार्थ करता येतात. शिरा, उपमा, धिरडं, थालिपीठ. हे पदार्थ खाल्ल्यानं भूकही भागते आणि पोट बराच वेळ भरलेलं राहातं. दुसरं काही खाण्याची इच्छा होत नाही.

2. उपवासाला जास्त तळलेले पापड, वडे किंवा भाजलेले शेंगदाणे खाल्ले तर उपवास करुन आरोग्याला काहीच फायदा होणार नाही. उलट नुकसानच होईल. पचन व्यवस्थेला आराम मिळावा म्हणून उपवास असतो. तेला-तुपातले पदार्थ पचायला अवघड असतात, त्यामुळे हे पदार्थ टाळायला हवेत.

 Image: Google

3. उपवासाला साखर आणि मीठाचं प्रमाणही सांभाळायला हवं.पण या दोन गोष्टी पूर्ण टाळूनही चालत नाही. नाहीतर त्याचा परिणाम रक्तातील साखर आणि रक्तदाबावर होतो. यासाठी साखर आणि सोडियमच्या नैसर्गिक स्त्रोतांवर भर द्यायला हवा. नैसर्गिक साखरेसाठी उपवासाला फळं खावीत. सोडियमसाठी घरी विरजलेलं ताजं दही खावं.

4. उपवासाला आपण योग्य प्रमाणात पाणी पितो आहोत ना याकडे लक्ष द्यावं नाहीतर डिहायड्रेशनचा धोका असतो. यासाठी उपवासाच्या दिवशी उठल्याबरोबर थोडं पाणी प्यायला हवं. जेव्हा जेव्हा तहान जाणवेल तेव्हा तहान भागेल एवढं पाणी प्यावं. पाण्याच्या सोबतच लिंबू पाणी, ताक, फळांचा रसही प्यावा.

5. उपवास आहे म्हणून, ऊर्जा मिळावी म्हणून चहा कॉफी भरपूर प्रमाणात प्यायली जाते. चहा कॉफीत कॅफीन मोठ्या प्रमाणात असतं. चहा कॉफी जास्त प्यायल्यानं शरीर आतून शुष्क होतं. उपवास असो की नसो चहा कॉफी प्रमाणातच घ्यायला हवी. तसेच चहा कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये.

Web Title: If something goes wrong while fasting, the health deteriorates; Remember these 5 rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.